गिरीश महाजन, अजितदादा, जयंत पाटील अन् राधाकृष्ण विखे पाटील करणार चित्रपटात भूमिका!

जामनेर येथे हलगट या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन महाजन यांच्या हस्ते झाले.
Girish Mahajan, Ajit Pawar, Jayant Patil, Radhakrishna Vikhe Patil
Girish Mahajan, Ajit Pawar, Jayant Patil, Radhakrishna Vikhe Patilsarkarnama
Published on
Updated on

जळगाव : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), माजी अर्थमंत्री भाजप नेते सुधीर मुनगट्टीवार, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि भाजप (BJP) नेते राधाकृष्ण विखे पाटील व माझी आता आमदारकीच्या सहा टर्म झाल्या आहेत. पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला चित्रपटात भूमिका दया अशी, मागणी भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांनी एका चित्रपट निर्मत्याकडे केली.

Girish Mahajan, Ajit Pawar, Jayant Patil, Radhakrishna Vikhe Patil
मोठी बातमी : माजी कॅबिनेट मंत्री जयप्रकाश मुंदडा यांच्यावर गुन्हा

जामनेर येथे हलगट या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अजितदादा पवार, सुधीर मुनगट्टीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील. व माझी आता आमदारकीच्या सहा टर्म झाल्या आहेत. तीस वर्षे आमदारकीची झाली आहे. पक्ष एकाच व्यक्तीला किती वेळा संधी देणार पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही. आम्ही रिटायर झालो तर भविष्यात आम्हाला ही चित्रपटात भूमिका करण्याची संधी द्यावी.

Girish Mahajan, Ajit Pawar, Jayant Patil, Radhakrishna Vikhe Patil
शिवसेनेनंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे दगडी चाळीत

यावर बोलताना चित्रपट निर्माते बाबुराव घोंगडे गमतीने म्हणाले, तुमच्यासाठी इंग्रजी चित्रपट काढून त्यात काम करण्याची संधी देईन या वेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. जामनेर येथील बाबुराव घोंगडे यांनी हलगट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. हा चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com