Amal Mahadik- Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : ‘पाटील कारखान्याच्या सभासदांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्यांची ‘राजाराम’मध्ये पोळी भाजणार नाही’

ही लबाडी राजाराम कारखान्याचा सूज्ञ शेतकरी सभासद चांगलाच ओळखून आहे.

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कसबा बावडा येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री सतेज पाटील आणि महाडिक कुटुंबीय पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. सतेज पाटील गटाच्या २९ जणांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आल्याने राजकीय आरोप-प्रत्यरोपही रंगू लागले आहेत. माजी आमदार अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी डी. वाय. पाटील कारखान्यावरून सतेज पाटील (Satej Patil) यांच्यावर तोफ डागली आहे. डी. वाय. पाटील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतणाऱ्यांची राजाराम कारखान्यात पोळी भाजणार नाही, अशी जहरी टीका त्यांनी पाटील यांच्यावर केली. (Amal Mahadik criticizes former minister Satej Patil)

प्रयाग चिखली येथील सभेत माजी आमदार महाडिक बोलत होते. ते म्हणाले की, कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारे विरोधकच विस्तारीकरण का केले नाही म्हणून विचारत आहेत. मात्र, कोणी कितीही विरोध केला तरी वर्षात कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

आजतागायत कारखान्याच्या विस्तारीकरणाला विरोध करणारी मंडळीच आज विस्तारीकरणाबाबत आम्हाला विचारणा करत आहेत. या गोष्टी सभासद शेतकरी जाणून आहे. कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभांमध्ये विरोधकांनी विस्तारीकरणाला केलेला विरोध सर्व सभासदांनी पाहिला आहे. मी विरोधकांना सांगू इच्छितो, इथून पुढे कोणी कितीही विरोध केला तरी राजाराम कारखान्याचे विस्तारीकरण हे होणारच, असेही महाडिक यांनी नमूद केले.

अमल महाडिक म्हणाले की, गगनबावड्यातील डी. वाय. पाटील कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम ज्यांनी केले, तेच आज शेतकऱ्यांचा कळवळा असल्याचे ढोंग करत आहेत. पण, ही लबाडी राजाराम कारखान्याचा सूज्ञ शेतकरी सभासद चांगलाच ओळखून आहे, त्यामुळेच त्यांची पोळी इथे भाजली जाणार नाही, याची खात्री आता विरोधकांनाही पटलेली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT