AI Generated Image  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Amit Shah Kolhapur visit : ना तांबडा-पांढरा, ना कोल्हापुरी बेत! दिल्लीचा आचारी अन् पुण्याहून डंबेल्स अमित शाहांच्या दौऱ्याची 'व्हीआयपी' तयारी

Amit Shah security arrangements : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी विशेष व्हीआयपी तयारी करण्यात आली आहे. दिल्लीहून खास आचारी, पुण्याहून डंबेल्स आणि अन्य सुविधांमुळे हा दौरा चर्चेचा विषय ठरला आहे.

Rahul Gadkar

केंद्रीय मंत्री अमित शाह आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. करवीर नगरी त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. कोल्हापूर खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असले तरी मंत्री अमित शाह यांच्या आरोग्याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. कोल्हापूर शासकीय विश्रामगृहात वास्तव्यास असून विशेष टीम कडून त्यांच्या जेवणाची व आरोग्याची काळजी घेतली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेष तयारी केली आहे. त्यांच्यासाठी शासकीय विश्रामगृहात विविध सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या दैनंदिन व्यायामाच्या सवयी लक्षात घेऊन तेथे विशेष ट्रेडमिल बसविले आहे. पुण्याहून डंबेल्स आणली आहेत. जेवण, नाष्ट्याच्या व्यवस्थेसाठी दिल्लीतून आचारी आले आहेत. इतक्या व्यस्त कार्यक्रमातूनही शाह फिटनेसबाबत काळजी घेत असल्याचे दिसते.

अमित शाह हे नियमित व्यायामाला प्राधान्य देणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांच्या मुक्कामादरम्यान व्यायामात खंड पडू नये, यासाठी विश्रामगृहात कोल्हापुरातील एका खासगी व्यायामशाळेतून अत्याधुनिक ट्रेडमिल आणि पुण्यातून चार किलो वजनाचे डंबेल्स आणले आहेत. संबंधित साहित्याची तपासणी करण्यात आली असून, सुरक्षा यंत्रणांनी या कक्षाची पूर्ण पाहणी केली आहे.

यासह सकाळचा नाष्टा, दुपारच्या जेवणाच्या व्यवस्थेची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री शाह यांच्या आहाराच्या सवयी आणि आरोग्यविषयक निकष लक्षात घेऊन दिल्लीहून दोन विशेष आचारी आणण्यात आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पातळीवरील स्वयंपाक कर्मचाऱ्यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यांना लागणारे आवश्यक साहित्य आणण्यात आले आहे. प्रत्येक पदार्थाची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षा याबाबत स्वतंत्र प्रोटोकॉल राबविण्यात येत आहे. दरम्यान, सुरक्षा यंत्रणांनी दौऱ्याच्या सर्व ठिकाणांची पाहणी पूर्ण केली असून, शासकीय विश्रामगृह, कार्यक्रमस्थळ आणि प्रवास मार्गावर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT