

Rajabhau Waje News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने ऑपरेशन टायगर राबवले. त्यासाठी मोठी अमिषे दाखविण्यात आली. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे त्याला न बघता निष्ठावंत राहिले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सहा खासदार फुटले. हे खासदार शिवसेना शिंदे पक्षात सामील झाले. त्यावर भिन्न प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः सोशल मीडियावर नेटकरी संतप्त आहेत.
मात्र या सर्व राजकीय गोंधळातही नाशिकचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची धूम आहे. सोशल मीडियावर वाजे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक अनोळखी नागरिकही त्यांना शुभेच्छा देत आहेत. खासदार वाजे ऑपरेशन टायगरला धडकून पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यासाठी अनेकांनी त्यांचे कौतुक केले. शिवसेना पक्षाच्या साठाव्या वर्धापनदिनी वाजे यांना सोशल मीडियावर वेगळेच गिफ्ट मिळाले. गेल्या दोन दिवसात त्यांचे चाळीस हजार नवे फॉलोवर्स तयार झाले आहेत.
पक्षनिष्ठा आणि उद्धव ठाकरे कुटुंबीयांची असलेली बांधिलकी खासदार वाजे यांनी विविध स्तरावर व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या मुंबईत झालेल्या वर्धापन दिनातही वाजे यांचे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विशेष कौतुक आणि सत्कार केला. त्यामुळे वाजे हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत असलेली सेलिब्रिटी ठरले आहेत.
राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनेक समर्थकांनी समाज माध्यमावर वाजे यांच्या भूमिकेचे कौतुक केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ऑपरेशन टायगर या दाव्यावर संतप्त प्रतिक्रिया आहेत. "शिंदे यांनी आपली मुले स्वतः जन्माला घालावीत, इतरांची मुले पळवू नयेत"या स्वरूपाच्या प्रतिनिधी प्रतिक्रियांचा पाऊस पडला.
राजकीय विश्लेषकांच्या मते समाज माध्यमावरील खासदार वाजे यांना वाढता प्रतिसाद हा त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेला अनुकूल आहे. हा केवळ लोकप्रियतेचा नाही तर मतदार आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचाही निर्देशांक म्हणता येईल. क्ष निष्ठेला प्राधान्य देणाऱ्या नेत्यांबाबत जनतेत सकारात्मक वातावरण आहे.
अनेक नेटकरी आणि मतदारांनी वाजे यांना आत्ताच २०२९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये गेल्या निवडणुकीत वाजे यांना समर्थन देणाऱ्यांचाही समावेश आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर त्यांची झालेली स्वागत त्याचाच एक भाग मानला जातो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.