आमदार राधाकृष्ण विखे पाटील सरकारनामा
पश्चिम महाराष्ट्र

अमित शहा शनिवारी प्रवरानगरमध्ये : राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेचे आयोजन

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर : देशातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला होता. या कारखान्याला देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शहा ( Amit Shaha ) भेट देणार आहेत. त्याची तयारी आता सुरू झाली आहे. Amit Shah on Saturday in Pravaranagar : Organizing state level co-operative council

सहकार परिषदेच्‍या निमि‍त्‍ताने प्रवरानगर येथील कामगार सांस्‍कृतिक भवनात तालुक्‍यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीला भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर, तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, सभापती नंदा तांबे, डॉ. विखे पाटील कारखान्‍याचे उपाध्यक्ष विश्‍वासराव कडू, गणेश कारखान्‍याचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, अॅड.रघुनाथ बोठे, नंदू राठी, अशोकराव म्‍हसे, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, जिल्हा परिषद सदस्‍या रोहिणी निघुते, दिनेश बर्डे, भाजयुमोचे सचिन तांबे, सतीश बावके, अभय शेळके, कैलास तांबे, नंदकुमार जेजूरकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार राधाकृष्ण विखे पाटील सांगितले की, सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवल्‍या गेलेल्‍या सहकाराच्‍या पंढरीत देशाचे पहिले सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या उपस्थितीत राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहीती भाजपाचे जेष्‍ठनेते आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. सहकार चळवळीला नवी दिशा देणाऱ्या या सहकार परिषदेच्‍या यशस्‍वीतेसाठी चळवळीतील कार्यकर्त्‍यांनी जय्यत तयारी करावी, असे आवाहन त्‍यांनी केले.

ते पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्‍या उपस्थितीत प्रवरानगर येथे शनिवार ( ता. 18 ) सकाळी 11 वाजता राज्‍यस्‍तरीय सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्‍या अध्‍यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेस केंद्रीय रेल्‍वे राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्‍यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील यांच्‍यासह सहकारी साखर कारखाना, सहकारी बॅंक, सहकारी पतसंस्‍था क्षेत्रातील मान्‍यवर उपस्थित राहणार असल्‍याचे आमदार विखे पाटील यांनी कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीत सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने सहकार मंत्रालयाची स्‍थापना केली. मंत्री अमित शहा यांच्‍याकडे या विभागाचा कार्यभार सुपूर्त करण्‍यात आला. सहकार चळवळीच्‍या दृष्‍टीने ही ऐतिहासिक बाब ठरली आहे. सहकार मंत्री झाल्‍यानंतर अमित शाह यांनी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांना अभिवादन करण्‍यासाठी येण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली होती. प्रवरा परिसराच्‍या दृष्‍टीने हा एक सुवर्णक्षण असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सहकार मंत्रालय स्‍थापन झाल्‍यानंतर सेवा सहकारी सोसायटी पासुन ते कारखानदारी पर्यंत आणि सहकारी पतसंस्‍थेपासुन ते सहकारी बॅंकींग क्षेत्राला बळकटी देण्‍याचे धोरण केंद्र सरकारने घेतले आहे. या सहकार परिषदेच्‍या माध्‍यमातून केंद्र सरकारने घेतलेल्‍या या ऐतिहासिक निर्णयबाद्दल कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याची संधी मिळाली असल्‍याचे आमदार विखे पाटील म्‍हणाले.

प्रवरा परिसरात यापूर्वीही देशपातळीवरील असंख्‍य नेत्‍यांनी येवून पद्मश्रींनी सुरु केलेल्‍या सहकार चळवळीच्‍या कार्याला दाद दिली. सहकार मंत्री अमित शाह यांच्‍या उपस्थितीत होणा-या या राज्‍यस्‍तरीय सहकार परिषदेत सहकार चळवळी पुढील प्रश्‍नांचा ओहापोह होवून नवी दिशा मिळेल असा विश्‍वास आमदार विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केला. याप्रसंगी माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर यांचेही भाषण झाली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्‍या प्रास्‍ताविकात सहकार परिषदेच्‍या नियोजनाची माहिती कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT