Amol Mitkari Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Loksabha : सोलापूरच्या काँग्रेस नेत्यांचे अमोल मिटकरींनी वाढविले टेन्शन!

शरद पवार नावाच्या योद्धाची ही पुण्याई आहे, की काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : आपले सरकार गेले असले तरी काळजी करण्याचे कारण नाही. कारण, २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) सर्वाधिक जागा निवडून आलेल्या असतील. मी तर म्हणतो पवार साहेबांना (Sharad Pawar) बोला आणि सोलापूर (Solapur) लोकसभा (Loksabha) मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसला मागा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सोलापूरच्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना केली. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सूचना केली असली तरी टेन्शन मात्र काँग्रेस नेत्यांचे वाढविले आहे. (Amol Mitkari's statement regarding giving Solapur Lok Sabha constituency to NCP)

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी एका मेळाव्यात बोलताना पक्षाच्या स्थानिक नेत्यांना वरील सूचना केली आहे. पण, सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मागणी करून त्यांची एकच खळबळ उडवून दिली आहे.

विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीने केलेल्या मदतीमुळे काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले, असा दावाही आमदार मिटकरी यांनी या वेळी बोलताना केला. ते म्हणाले की, मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे कोणतेही वरिष्ठ नेते प्रचारात फिरले नव्हते. मात्र, साताऱ्याची शरद पवार यांची सभा झाली आणि ज्या काँग्रेसचे चारही आमदार निवडून येणार नव्हते, त्यांचे ४४ आमदार निवडून आले. ही पुण्याई कॉंग्रेसवाल्यांनी विसरू नये. शरद पवार नावाच्या योद्धाची ही पुण्याई आहे, की काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले.

भारतीय जनता पक्ष हा प्रादेशिक पक्षांना संपवत आहे, हे शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आणून दिले. त्यानंतर महाविकास आघाडी आस्तित्वात आली, असा दावाही मिटकरी यांनी केला.

दरम्यान, सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा दोन्ही काँग्रेसच्या आघाडीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला गेला आहे. येथून ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, मागील दोन लोकसभा निवडणुका ते हरले आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ आता राष्ट्रवादीकडे द्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT