Cabinet Expansion News : शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात सावंत, देसाई, सत्तार यांच्यासह नऊ मंत्र्यांचे वाढले ‘वजन’!

मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याने इच्छुक आमदारांची मात्र घालमेल वाढली आहे. त्यांना आणखी काही दिवस देव पाण्यात ठेवून बसण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.
 Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

मुंबई : आगामी हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet expansion) होणार नाही, हे आता जवळपास नक्की झाले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार लांबल्याने इच्छुक आमदारांची (MLA) मात्र घालमेल वाढली आहे. त्यांना आणखी काही दिवस देव पाण्यात ठेवून बसण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्याकडील अतिरिक्त मंत्रिपदाचा कार्यभार आपल्या नऊ मंत्र्यांकडे सोपविला आहे. (Chief Minister Eknath Shinde handed over the responsibility of his department to nine ministers)

मंत्रिमंडळाचा संपूर्ण विस्तार न झाल्याने एक मंत्र्यांकडे अनेक खात्यांचा कार्यभार आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक खाती आहेत. मात्र, आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देता यावीत, यासाठी शिंदे यांनी त्यांच्याकडील मंत्रीपदाचा कार्यभार अधिवेशन काळापुरता आपल्या गटातील मंत्र्यांकडे सोपविला आहे.

 Eknath Shinde
Himachal Pradesh : मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये मोठे घमासान : सिंह समर्थकांची घोषणाबाजी; सुखविंदर सिंग समर्थक आमदारांची बैठक

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान, शंभूराज देसाई यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सावर्जनिक उपक्रम) आणि परिवहन, दादा भूसे यांच्याकडे पणन, संजय राठोड यांच्याकडे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, तानाजी सावंत यांच्याकडे मृद्‌ व जलसंधारण, अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्याक व औकाफ, दीपक केसरकर यांच्याकडे पर्यावरण व वातावरणीय बदल आणि सामान्य प्रशासन, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थान या विभागाचा कार्यभार संदीपान भूमरे यांच्याकडे, तर गुलाबराव पाटील यांच्याकडे माहिती व जनसंपर्क विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपात हिवाळी अधिवेशनापुरती आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Eknath Shinde Letter
Eknath Shinde LetterSarkarnama

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील मंत्रीमंडळ विस्तारानंतर सरकारचे कामकाज सुरळीत सुरू असल्याचे सांगत, या सरकारमधील काही मंत्र्यांनीच विस्ताराला विरोध केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, नेमके कोणाला मंत्री करायचे, यावरून भाजपमध्ये निर्णय होत नसल्याने हा विस्तार रखडल्याकडे शिंदे गट बोट दाखवत आहे. शिंदे गटातील नऊ मंत्र्यांना इतर सहकारी नको असल्यानेच नव्या मंत्र्यांचा शपथविधी होत नसल्याचेही सांगण्यात येत आहे.

 Eknath Shinde
Vasant More News : वसंत मोरेंविषयी मनसेच्या नेत्याचे मोठे विधान : म्हणाले, ‘वसंत मोरे ताकदवान हे....’

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजांची समजूत काढून मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार १५ सप्टेंबरपर्यंत करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे आणि भाजपकडून इच्छूक आमदारांना देण्यात आले होते. मात्र, ती तारीख तर गेलीच आहे. पण, हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्तही आता हुकणार हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. यामुळे शिंदे गटातील आमदारांच्या नाराजीत मात्र भर पडत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com