अहमदनगर - भाजपच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना सुरवातीला राज्यसभेचे व नंतर विधानपरिषदेच्या उमेदवारीचे तिकीट भाजप पक्ष श्रेष्ठींनी दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पंकजा मुंडे समर्थक असलेल्या भाजप कार्यकर्त्याने भर पत्रकार परिषदेत विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पंकजा मुंडे समर्थकांतील असंतोष उफाळून बाहेर आला आहे. ( An angry Pankaja Munde activist attempted suicide )
भाजपने दोन दिवसांपूर्वी विधानपरिषदेसाठी पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. ही उमेदवारी पंकजा मुंडे यांना मिळणार असे कयास लावले जात असतानाच त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली. राज्यातील 55 विधानसभा मतदार संघात पंकजा मुंडे यांचे समर्थक आहेत. त्यातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने टाळल्याने पंकजा मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. दरवेळी पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याची भावना समर्थकांत आहे. कार्यकर्त्यांच्या संतापाचा आज विविध ठिकाणी उद्रेक झालेला दिसून आला. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले भाजप कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी विषारी औषध प्राशन करण्याचा प्रयत्न करत आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर मुकुंद गर्जे यांना पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
विधान परिषदेसाठी भाजपाकडून जाहीर केलेल्या नावांमध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश नसल्याने समर्थकांमध्य नाराजीचा सूर आहे. दोन दिवसापासून समर्थकांमधून नाराजी व्यक्त करत संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत. उमेदवारी नाकारल्याने मुंडे समर्थक भाजपावर व्यक्त करत आहेत.
पाथर्डी येथे भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष अमोल गर्जे यांच्या कार्यालयात आपल्या भावना व्यक्त करत असतांना मुकुंद गर्जे यांचा संयम सुटला आणि त्यांनी विषारी औषध घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र वेळीच तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी मुकुंद गर्जे यांना रोखल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र विषारी औषधाचा काही अंश मुकुंद गर्जे यांच्या शरीरात गेला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.