गो. रा. कुंभार
Solapur, 14 November : मोहोळचे आमदार म्हणतात की, मतदारसंघात मी तीन हजार कोटी रुपयांचा विकास निधी आणला. पण तीन हजार कोटींचा निधी आणल्याची राज्यातील ही पहिलीच केस असावी. मोहोळच्या आमदारांनी तीन हजार कोटी रुपयांची कामे केली असती तर मतदारसंघातील सर्व रस्ते हे सोन्याचे झाले असते, त्यामुळे ठेकेदाराला पुन्हा आमदार करू नका. खरे बोलणाऱ्या राजू खरेला आमदार करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच, अवघ्या तीन दिवसांत अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा शब्दही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मोहोळच्या जनतेला दिला. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे उमेदवार राजू खरे यांच्या प्रचार सभेत बोलत होते.
भाजपने देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी आता राजू खरे यांना मदत करावी, असे आवाहन करून जयंत पाटील यांनी तालुक्यातील शिंदे गटाला चुचकारण्याचे काम केले आहे.
मोहोळ तालुक्यातील (Mohol Taluka) सीना-भोगावती जोड कालव्याचे काम तीन वर्षांत पूर्ण केले जाईल. मोहोळ औद्योगिक वसाहतीत रोजगाराची व्यवस्था करून तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम देण्यात येईल. चांगली आरोग्य सुविधा मोहोळ तालुक्यात नाही. शाळा, महाविद्यालये, अद्यायवत एसटी बसस्थानक, मोहोळच्या रेल्वे स्टेशनवर गाड्या थांबत नाहीत, त्यामुळे मोहोळच्या विकासासाठी राजू खरे यांना निवडून द्या, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील अन्याय, अत्याचार, गुंडगिरी, दादागिरी संपविण्यासाठी जयंत पाटील साहेब, तुम्ही तालुक्याचे पालकत्व घ्यावे. मी आज तुम्हाला शब्द देतो की, तुमच्या जुन्या पक्षाचा माणूस मोठ्या मताधिक्याने पडला आहे. राजू खरे हे शंभर टक्के विजयी झाले आहेत, असे दीपक गायकवाड यांनी जयंत पाटील यांना भरसभेत सांगितले.
मोहोळ तालुका दादागिरी, गुंडगिरीतून मुक्त करायचा आहे. तसेच, महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर अनगर अप्पर तहसील कार्यालय तीस दिवसांत रद्द करावे, अशी विनंती उमेदवार राजू खरे यांनी जयंत पाटील यांना केली. उमेश पाटील म्हणाले, खोके घेऊन आमदार केल्यामुळे मोहोळ तालुक्यातील गोरगरीब, दलित तरुण आमदार होऊ शकला नाही, त्यामुळे मोहोळचे आमदार करण्यासाठी राजन पाटील हे नामधारी ठरले आहेत.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.