Anil Parab in Shirdi, Anil Parab News, Anil Parab ED Case News updates
Anil Parab in Shirdi, Anil Parab News, Anil Parab ED Case News updates Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'ईडी'ची नोटीस मिळताच अनिल परब साई दरबारात हजर

अमित आवारी

अहमदनगर - राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब ( Anil Parab ) यांना अंमलबजावणी संचालनालयाने ( ED ) नोटीस दिली आहे. आपले म्हणणे सादर करण्यासाठी परब उद्या ( ता. 16 ) ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. तत्पूर्वी आज सकाळी त्यांनी शिर्डी येथे जाऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यामुळे मंत्री परब यांचे दर्शन चर्चेचा विषय ठरले आहे. ( Anil Parab Sai appeared in the court as soon as he got the notice from the ED )

साईबाबांचे दर्शन झाल्यावर मंत्री परब यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "मी एका बैठकी निमित्त नाशिकला आलो होतो. या परिसरात आलो तर मी साईबाबांचे दर्शन घेतो. हे दर्शन मी आजच घेतोय असे नाही. मी लहानपणीपासून साईंच्या दर्शनासाठी येतो. हे संपूर्ण भारत देशाचे श्रद्धास्थान आहे. सर्व भाविक साईंच्या चरणीलीन होतात. त्यापैकीच मीही एक आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. (Anil Parab ED Case News updates)

ते पुढे म्हणाले की, "ईडीची नोटीस मला कालच मिळाली. मी मुंबईत नसल्यामुळे मी आज ईडी कार्यालयात जाऊ शकलो नाही तसे मी ईडी कार्यालयाला कळविले आहे. मी मुंबईत गेल्यावर अवश्य ईडी कार्यालयात जाईल. ते जे प्रश्न विचारतील त्याला उत्तरे देण्यासाठी मी बांधील आहे," असे त्यांनी सांगितले.

सोमय्याला उत्तर द्यायला बांधील नाही

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात विचारले असता ते म्हणाले, "किरीट सोमय्याला उत्तर द्यायला बांधील नाही. किरीट सोमय्या काही जरी बोलला तरी मला विचारण्याचा अधिकार त्याला नाही. मला विचारण्याचा अधिकार ज्या तपास संस्थांना आहे. त्यांना मी या पूर्वीही उत्तरे दिली आहेत. या पुढेही उत्तरे देणार आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी चौकशीतून काय निष्पण्ण होते ते पहावे," असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

मी साईबाबांकडे महाराष्ट्राबाबतच मागण केलं आहे की, "बळीराजा सुखी होऊ दे, चांगला पाऊस पडू दे, अशी मागणी केली. शिर्डीत आल्यावर एक ऊर्जा मिळते. ही ऊर्जा बाबांच्या चरणी कायम मिळत राहो, ही प्रार्थना केली आहे. मंत्री आदित्य ठाकरे यांचा अयोद्ध्या दौरा पूर्व नियोजित होता. हा काही राजकीय दौरा नाही. ते रामाच्या दर्शनासाठी गेलेले आहेत," असे परब यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT