मुंबई : आर्यन खान याला अमली पदार्थविरोधी कारवाईत पोलिसांनी पकडल्यांनी राजकीय आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. मात्र प्रत्यक्षात मुंबईत मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा अमली पदार्थविरोधी कारवायांत तब्बल सात पटीने वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई नक्की चाललय काय असा प्रश्न सामान्यांना भेडसावू लागला आहे. Anti-drug action has increased sevenfold this year
मुंबईत गेल्या तीन वर्षांत अमली पदार्थविरोधी कारवाईत पोलिसांनी 208 गुन्हे दाखल केले असून यात 298 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 131 कोटींचा 3414 किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र मागील 3 वर्षांच्या तुलनेत या वर्षी कारवाईत तब्बल सातपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई अमली पदार्थांचा अड्डा तर बनत नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई पोलिसांकडे मागील तीन वर्षांत अमली पदार्थ आणि अन्य उत्तेजक पदार्थांवरील कारवाईबाबत माहिती मागवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 आणि 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये अमली पदार्थ विरोधी कक्ष अधिक सक्रिय झाला आहे. 2019 मध्ये 394.35 किलोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याची एकूण किंमत 25 कोटी 29 लाख रुपये इतकी आहे. 2020 मध्ये 427.277 किलो मुद्देमाल जप्त केला आहे. त्याची किंमत 22.24 कोटी आहे; तर 2021 मध्ये 20 ऑक्टोबरपर्यंत 2592.93 किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांची किंमत 83.19 कोटी इतकी आहे.
अमली पदार्थ विरोधी कक्षाने 2019 आणि 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये सर्वाधिक गुन्हे नोंदवले, तसेच या वर्षी अटक केलेले आरोपीसुद्धा सर्वाधिक होते. 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 94 गुन्हे नोंदवले गेले. त्यात 137 आरोपींना अटक झाली. 2019 मध्ये 70 गुन्ह्यांत 103 आरोपींना अटक करण्यात आली; तर 2020 मध्ये फक्त 44 गुन्ह्याची नोंद झाली. त्यात अटक आरोपींची संख्या 58 होती.
पोलिसांची तयारी
अमली पदार्थविरोधी कारवाईसाठी मुंबईत पाच युनिट कार्यरत आहेत. यात दक्षिण प्रादेशिक विभाग- आझाद मैदान युनिट, मध्य प्रादेशिक विभाग- वरळी युनिट, पश्चिम प्रादेशिक विभाग- बांद्रा, पूर्व प्रादेशिक विभाग- घाटकोपर युनिट, उत्तर प्रादेशिक विभाग- कांदिवली युनिट यांचा सहभाग आहे. स्थानिक पातळीवर गुन्ह्यांत वाढ झाल्यास त्या पोलिस ठाण्याच्या अधिकारी वर्गाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. यासाठी स्थानिक पातळीवर जनजागृती आणि धडक कारवाईची अपेक्षा गलगले यांनी व्यक्त केली आहे.
कारवाई वेग पकडणार
पोलिसांच्या कारवाईतून गांजा, चरस, एमडी, कोकेन, एमडीएमए, कोडेइन, ओपीम, एलएसडी पेपर्स, अल्परझोअम, नेत्रावेत टॅब्लेट असे अनेक अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तसेच, या वर्षी अमली पदार्थविरोधी कारवाईत आणखी भर पडण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.