धक्कादायक : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मनीष भंगाळेला पाच लाखांची ऑफऱ

भंगाळे यांनीही अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
Aryan Khan and Manish Bhangale
Aryan Khan and Manish Bhangale
Published on
Updated on

जळगाव : आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला (Aryan Khan Drugs Case) दररोज वेगळं वळण मिळत आहे. या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलने (Prabhakar Sail) एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणातील दुसरा साक्षीदार किरण गोसावी (Kiran Gosavi) याने हे प्रकरण मिटवण्यासाठी अभिनेता शाहरूख खानकडून (Shahrukh Khan) पैसे उकळल्याचा दावाही त्याने केला आहे. त्यातच आता सायबर हॅकर मनीष भंगाळे (Manish Bhangale) याची एन्ट्री या प्रकरणात झाली आहे.

भंगाळे यांनीही अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. पुराव्याची छेडछाड करण्यासाठी आपल्याला पाच लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती, या बाबत आपण मुंबई पोलिसांना पत्र दिले असल्याची माहिती भंगाळे यांनी दिली आहे. भंगाळे हा सायबर हॅकर असून जळगाव जिल्हयातील यावल तालुक्यातील मूळ रहिवासी आहे. त्याने आर्यन खान प्रकरणात खळबळजनक खुलासा केला आहे.

Aryan Khan and Manish Bhangale
क्रुझ ड्रग्ज प्रकरणाचा तपास वानखेडेंकडे राहणार की नाही? 'एनसीबी'ने केला मोठा खुलासा

मुंबई पोलीस आयुक्तांसह राज्याच्या गृहमंत्री व केंद्रीय गृहमंत्र्यांना त्याने पत्र दिले आहे. या पत्रात तो म्हणतो, ६ ऑक्टोबर रोजी जळगाव येथे आपल्याला भेटण्यासाठी दोन व्यक्ती आलोक जैन व शैलेश चौधरी आल्या होत्या. त्यांनी आपल्याला सीडीआर काढून मिळेल का? अशी विचारणा करीत पूजा दादलानी या नावाने सेव्ह असलेला नंबर दाखविला. त्यात एक व्हॉटसअप चॅट चा बॅक अप दाखविला. तो आर्यन खान नावाने सेव्ह होता.

Aryan Khan and Manish Bhangale
क्रूझ ड्रग्स प्रकरणातील किरण गोसावीला पुणे पोलिसांकडून अटक

हे काम केले तर तुम्हाला पाच लाख रुपये मिळतील, असे सांगत त्यांनी आपल्याला दहा हजार रुपये आगाऊ रक्कम दिली. त्या दोघांनी आपल्याला प्रभाकर साईल या नावाने सिमकार्ड काढून मिळेल का? असेही विचारले. जाताना त्यांनी एक नंबर दिला जो आपण ट्रूकॉलरवर चेक केला तो सॅम डिसुझा या नावाने असल्याचे आपणास दिसून आले. आपण प्रभाकर साइल यास टीव्हीवर पाहिल्यानंतर मला गोष्टी लक्षात आल्या, असे भंगाळे याने म्हटलं आहे. क्रुझ ड्रग प्रकरणात काही तरी काळबेर असण्याची शक्यताही त्याने व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com