Anna Hajare On Lokayukt : Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Anna Hazare On Lokayukt : 'लोकायुक्त' मंजूर करा, अन्यथा आंदोलनाचा माझा मार्ग मोकळा'; आण्णांचा सरकारला इशारा

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधानसभेत मंजूर झालेले महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक पुढे मात्र विधानपरिषदेत मंजूर होऊ शकले नाही. त्यानंतर चार-पाच वर्षात अजूनही लोकायुक्त विधेयक एक प्रकारे बासनात गुंडाळून ठेवल्याची स्थिती असताना, आता मात्र येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत विधेयक चर्चेला आणून मंजूर करण्याची प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrushna Vikhe) यांनी काल मंगळवारी (8 ऑगस्ट) समाजसेवक अण्णा हजारे यांना प्रत्येक्ष भेटून दिले.

राळेगणसिद्धी मधे विखे यांनी काल सायंकाळी हजारे यांची भेट घेत राज्यसरकारच्या वतीने आण्णांशी जवळपास दीड तास चर्चा केली. यावेळी विखे यांनी विधानपरिषदेत विधेयक मंजूर करण्यासाठी येत असलेल्या अडचणींची माहिती देत येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मंजुरीसाठी सरकार विधानपरिषदेत आणेल, असे स्पष्ट केले.

राज्याच्या लोकायुक्त कायद्याच्या कक्षेत मुख्यमंत्री यांनाही आणावे, अशी विरोधी पक्षांची मागणी आहे. या मागणीला अनुकूलता दाखवत कमिटीच्या आगामी बैठकीत चर्चा करू आणि हिवाळी अधिवेशनात विधायक आणू, प्रसंगी तरतुदीच्या अनुषंगाने अध्यादेश यावरही विचार करू, असेही विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्य सरकारने वेळकाढूपणा करू नये, मात्र येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषदेत कायद्याला मंजुरी मिळावी. अन्यथा माझा आंदोलनाचा मार्ग मोकळा आहे, असा गर्भित इशारा अण्णांनी दिला आहे. मात्र सरकारच्या काही अडचणी असू शकतात. त्यामुळे त्यांना वेळ दिला आहे, असेही आण्णा हजारेंनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT