Pandharpur Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात परंपरेनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पहाटे सपत्नीक पूजा केली.त्यांच्यासोबत अहमदनगर जिल्ह्यातील भाऊसाहेब काळे व त्यांच्या पत्नी मंगल काळे या दाम्पत्याला महापूजा करण्याचा मान मिळाला. विठ्ठल -रुक्मिणीची विधीवत महापूजा करण्यात आली.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल -रुक्मिणीची महापूजा झाल्यानंतर विठूरायाचे मुखदर्शन बंद ठेवण्यात येते. पण यंदा महापूजेचा सोहळा पार पडल्यानंतर लगेचच भाविकांना विठूरायाचे मुखदर्शन घेण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे विठ्ठलाचे महापूजेनंतरचे तेजस्वी रुप हजारो वारकऱ्यांना पाहता आले.
पूर्वी महापूजा होईपर्यंत चार तासासाठी दर्शन बंद करण्यात येत होते. मात्र, या वर्षी मुखदर्शन सुरू राहिल्याने दर्शनाची आस असलेल्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.
वारी काळात भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सुलभ व जलद व्हावे, यासाठी आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेच्या कालावधीत मुखदर्शन सुरू राहणार असल्याचे दोन दिवसापूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले होते.
आषाढी एकादशी निमित्त आज प्रथम विठ्ठलाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाची सपत्नीक महापूजा केली. विठ्ठलाची महापूजेनंतर शिंदे व काळे दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. त्या ठिकाणी त्यांनी रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक करून त्यांचीही पूजा केली.
सलग दुसऱ्या वर्षी महापूजेचा मान
'बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, चांगला पाऊस होऊ दे,' असे साकडे यावेळी मुख्यमंत्र्याना विठ्ठलाला घातले. 'यंदा मला सलग दुसऱ्या वर्षी विठ्ठलाच्या महापूजेचा मान मिळाला. गतवर्षी सरकार स्थापन करून मी विठ्ठलाच्या महापूजेला आलो होतो. विठ्ठलाच्या कृपेने राज्यात सर्वकाही सुरुळीत सुरू असून, सरकार लवकरच आपले एक वर्ष पूर्ण करणार आहेत,' असे शिंदे हणाले.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.