Bihar politics : मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला ; तर्कवितर्कांना उधाण, मंत्रीमंडळ विस्तार..

Nitish Kumar meets Governor : पावसाळी अधिवेशनात राज्यपाल आर्लेकर यांचे अभिभाषण होणार आहे,
CM Nitish Kumar
CM Nitish KumarSarkarnama

Patna News : बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार हे आज (बुधवारी) राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या भेटीसाठी राजभवनात गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची अचानक भेट घेतल्याने बिहारच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

दहा जुलैपासून बिहार विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे. हे पावसाळी अधिवेशन पाच दिवस चालण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नीतिशकुमारांनी राज्यपालांची घेतलेली भेट चर्चेची ठरत आहे. हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यासाठी विरोधक रणनीती आखत असताना ही भेट महत्वपूर्व ठरणार असल्याची माहिती आहे.

CM Nitish Kumar
Congress Vs BJP : राहुल गांधींच्या विरोधात टि्वट करणं भाजप नेत्याला पडलं महागात; काँग्रेस आक्रमक, पोलिसात..

पावसाळी अधिवेशनात राज्यपाल आर्लेकर यांचे अभिभाषण होणार आहे, यासाठी मुख्यमंत्री नीतिशकुमार यांनी त्यांची भेट घेतली असल्याची चर्चा आहे, पण काही दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीनंतर उलट-सुलट चर्चांना सुरवात झाली आहे.

CM Nitish Kumar
ED News : सनदी अधिकारी सचिन सावंत यांना ईडीकडून अटक ; नातेवाईकांची चौकशी सुरु..

नीतिशकुमार सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा काही दिवसापासून सुरु आहे. नुकतीच देशातील विरोधी पक्षाची बैठक पाटण्यात झाली. यावेळी काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी नीतिशकुमार यांच्या भेटीत काँग्रेसच्या दोन नेत्यांना मंत्रीमंडळात सहभागी करुन घेण्याबाबत आग्रह केला असल्याची माहिती आहे. त्यामुळे आजच्या मुख्यमंत्री-राज्यपाल भेटीत याबाबत चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com