Solapur, 05 September : माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुढाकाराने सांगोल्यात युवा सेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात शहाजीबापू पाटील यांनी नवा गौप्यस्फोट केला. ‘आमच्या भाच्याला निवडणुकीत पाडण्यासाठी आणि त्याला जिवानिशी संपवण्यासाठी अशोक खरातला आणून सांगोल्यात पूजा करण्यात आली होती,’ असा आरोप माजी आमदार पाटील यांनी केला आहे.
सांगोला तालुका शिवसेनेच्या वतीने युवा सेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या मेळाव्यात बोलताना माजी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, दीपाली सय्यद या ठिकाणी आल्या आहेत. ताई तुमचा काहीतरी पिक्चर येतोय. (त्यांना महाराष्ट्र एपस्टिन फाईल न उचारता आल्याने) ‘महाराष्ट्र ....’ काहीतरी नाव दिलंय. माझं इंग्रजी एवढं काय चांगलं नाही. पण तुमच्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये एक घोटाळा झाला आहे. त्या अशोक खरातने आमच्या तालुक्यात पूजा केली होती, हे तुम्हाला माहिती आहे का?, असा सवाल त्यांनी अभिनेत्री सय्यद यांना केला.
माजी आमदार पाटील म्हणाले, अशोक खरात आमच्या सांगोला तालुक्यातील जवळा भागात येऊन गेला आहे. रात्रभर पूजा सुरू होती. उघडी-नागडी बसली होती, रात्रभर नुसता धिंगाणा सुरू होता. हे सर्व कशासाठी सुरू हेातं, तर शहाजीबापूचा भाचा अतुल पवार निवडणुकीत उभा होता, त्याला पाडण्यासाठी रात्रभर पूजाअर्चा सुरू होती. पुन्हा मला बातमी कळाली की, माझ्या भाच्याला जिवानिशी मारायचं ठरलं म्हणून.
माझा भाचा अतुल पवार हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत होता. तु कुठल्या तरी पक्षातून उभा राहा आणि तुला आम्ही निवडून आणतो, असे त्याला सांगितलं होतं. त्याचा मला फोन आला आणि म्हणाला, ‘मामा, जवळ्यात पूजा चालू आहे आणि मूठ मारून मला मारण्याचा त्यांचा डाव चालला आहे.’ त्यावर मी त्याला ‘तू काळजी करू नको,’ असे सांगितले होते, असे शहाजीबापूंनी म्हटले आहे.
टीव्हीवाल्यांना बाईट दे की, आता माझा शेवटचा क्षण आहे. मी आता मरणार आहे. सांगोला तालुक्यातील जनतेला माझा शेवटचा रामराम, असं म्हण आणि दे सोडून. तू काय मरत नाही. त्या महाराजापेक्षा बाप महाराज तुझा मामा आहे. लय महाराज इथं येऊन गेले आहेत, तुला माझा आशीर्वाद आहे. तू शंभर वर्षे मरत नाही, त्यामुळे तू काळजी करू नको, असे मी त्याला सांगितले होते, असेही शहाजीबापूंनी नमूद केले.
मेळाव्याला रोहयो मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, खासदार ज्योती वाघमारे, अभिनेत्री दिपाली सय्यद, क्रीडा सेनाप्रमुख चंद्रहार पाटील, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार संजय कदम, सांगोला पंचायत समितीचे सभापती दत्तात्रेय मगर, नगरसेवक अमोल शिंदे उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.