Gokul election : 'गोकुळ'मध्ये हसन मुश्रीफच 'बाजीगर'; अदृश्य शक्तीला रोखलं, पण खरी परीक्षा तर...

Hasan Mushrif political challenge News : निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती म्हणून सामोरे जात असताना पुन्हा एकदा अनेक आव्हाने त्यांच्यासमोर येण्याची शक्यता आहे.
Satej Patil and Hasan Mushrif
Satej Patil and Hasan MushrifSarkarnama
Published on
Updated on

kolhapur News : जिल्ह्याचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) प्रारूप यादीतून अपात्र ठरवलेल्या बहुतांशी 5 हजार 332 संस्था अखेर न्यायालयाने पात्र केल्या. या संस्थांना पात्र करण्यासाठी प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रमुख भूमिका राहिली आहे. या लढाईत मंत्री मुश्रीफ जिंकले असले तरी येथून पुढे त्यांची सर्वात मोठी परीक्षा असणार आहे. निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती म्हणून सामोरे जात असताना पुन्हा एकदा अनेक आव्हाने त्यांच्यासमोर येण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे संस्था चालकांची मनधरणी त्यातून महायुतीची मोट बांधणी याचे आव्हान मंत्री मुश्रीफांनाच पेलावे लागणार आहे.

प्रारूप मतदार यादीत अपात्र केलेल्या संस्थांमुळे महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चिघळला आहे. अदृश्य शक्तीकडून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना घेरण्याचा डाव आखला गेला. पर्यायाने मंत्री हसन मुश्रीफ यांचे 'गोकुळ'वरील वर्चस्व रोखण्याचा प्रयत्न केला. ठरावांच्या संख्येवरून पक्षांना जागा वाटपाचा जाहीर झालेला फॉर्म्युला याला कारणीभूत ठरला. पाच वर्षापूर्वी झालेल्या 'गोकुळ'च्या निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या सर्व विरोधकांना एकत्र आणून सत्तांतर घडवले. पण, त्यानंतर राज्याची राजकीय समीकरणे बदलली आणि त्याचे पडसाद जिल्ह्यातही उमटले.

'गोकुळ'ची आताची निवडणूक सतेज पाटील विरुद्ध महायुती अशीच होण्याची शक्यता होती. महायुतीच्या नेत्यांनीही वारंवार त्याला दुजोरा दिला होता. पण, महायुतीतच नव्याने केलेल्या संस्थांना सभासदत्व देण्यावरून अंतर्गत मोठी धुसफूस सुरू होती. त्यात ज्या पक्षांकडे ठरावांची संख्या जास्त त्याला निवडणुकीत संचालक पदाच्या सर्वाधिक जागा असे सूत्रही जाहीर करण्यात आले आहेत.

अपात्र केलेल्या संस्थांपैकी सर्वाधिक संस्था राष्ट्रवादीच्या आणि पर्यायाने मंत्री मुश्रीफ यांच्यासह त्यांचे नेतृत्व मानणाऱ्या नेत्यांच्या होत्या. अगदी गोकुळ दूध संघाची अंतिम यादी जाहीर होण्यापर्यंत मंत्री मुश्रीफ यांनी तगडी फाईट अदृश्य शक्तीला दिली आणि न्यायालयातून या संस्था पात्र करून आणण्यामध्ये मुश्रीफ बाजीगर ठरले.

Satej Patil and Hasan Mushrif
Gokul Election : गोकुळ ‘बिनविरोध’ची चर्चा कुठून सुरु झाली? महाडिकांसाठी फडणवीसांना मैदानात उतरवलं? सतेज पाटलांनी उधळला सगळा प्लॅन!

अदृश्य शक्तीच्या या प्रयत्नमुळे मंत्री मुश्रीफ आणि त्यांना मानणाऱ्या नेत्यांनी वाढवलेल्या संस्था कमी करून त्यांची बाजू कमकुवत करण्याचा यातून प्रयत्न झाला. याला थेट भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा असल्याचे दिलेल्या निकालावरून दिसले होते. अगदी राज्याच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत अदृश्य शक्तीकडून मुश्रीफ हे आपल्या बाजूने निवडणुकीत कसे नसतील ही बाजू पटवून देण्यात यशस्वी झाले होते. अगदी महायुतीचा अध्यक्ष झाल्यानंतर गोकुळमधील प्रत्येक कार्यक्रमातील फोटो हे वरिष्ठ नेत्यांपर्यंत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे सहाजिकच मंत्री मुश्रीफ यांच्या अडचणी आणखीन वाढत होत्या. त्यामुळे आजपर्यंचे 'गोकुळ'च्या संबंधित घडामोडी पाहता महायुतीतच भाजप विरुद्ध मंत्री मुश्रीफ, असा उघड संघर्ष पहायला मिळत आहे.

Satej Patil and Hasan Mushrif
Gokul Election : गोकुळच्या निवडणुकीला पुन्हा ‘ब्रेक’ लागणार? 1750 संस्थांचा फैसला होताच दोन्ही बाजूंनी कोर्टात जाण्याची तयारी

मात्र, अशा परिस्थितीत मंत्री मुश्रीफ यांच्याकडून महायुती संदर्भात कोणतीही भडक प्रतिक्रिया न देता शांत डोक्याने न्यायालयीन लढा सुरू ठेवला होता. संस्था चालकांचा रोष दिसत असला तरी मंत्री मुश्रीफांची एकाकी लढत 'गोकुळ'च्या या लढाईत संस्थांची नोंदणी, पात्र-अपात्रचा निर्णय, न्यायालयीन लढाई, अधिकाऱ्यांच्या ऐनवेळी बदल्या या विरोधात मंत्री मुश्रीफ हे एकटेच संघर्ष करत राहिले. अखेर न्यायालयीन लढाईत गोकुळ दूध संस्थेच्या अंतिम यादीत अपात्र संस्थांचा समावेश झाला तब्बल 5 हजार 332 संस्था पात्र झाल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही लढाई जिंकली.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही लढाई सध्या जिंकली असली तरी इथून पुढे निवडणूक संप्रेपर्यंत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. ज्या दूध संस्थांनी न्याय मागण्यासाठी आजपर्यंत कधी गोकुळ दूध संघाची पायरी चढली नाही अशा संस्थांना दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढावी लागली. आपली संस्था पात्र करण्यासाठी दुर्गम भागातून या संस्था दुग्ध निबंधक कार्यालयात येत असल्याने अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागला. कागदपत्र गोळा करण्याचा मानसिक त्रास ही या संस्थांना सहन करावा लागला.

रोज होणारी सुनावणी आणि न्यायालयीन लढाई यामुळे नेते देखील त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा दिसून आला. ही महायुती म्हणून एकत्र लढली जाणार असली तरी या संस्थाचालकांचा रोष अदृश्यशक्तीवर आहे. मतदानाच्या माध्यमातून हे संस्थाचालक अदृश्य शक्तीला त्याची जागा दाखवून देण्याची भाषा करत आहेत. मंत्री मुश्रीफ यांच्यावर या महायुतीची धुरा असणार आहे. अशावेळी संस्थाचालकांची मनधरणीसाठी मंत्री हसन मुश्रीफ यांनाच प्रयत्न करावे लागणार आहेत.

Satej Patil and Hasan Mushrif
Gokul election : गोकुळमध्ये मुश्रीफ-महाडिक वाद पेटला; महायुतीतून थेट भाजपलाच वगळण्याचा डाव, बड्या नेत्याचे प्रयत्न मुख्यमंत्री हाणून पाडणार?

महायुती म्हणून निवडणूक झाल्यास आणि त्यामध्ये आदर्श शक्तीचा पराभव झाल्यास त्याची खापर मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरच फुटले जाण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर महायुतीचा विजय झाल्यास त्याचे श्रेय घेण्यास अदृश्य शक्ती देखील पुढे येऊ शकते. मंत्री हसन मुश्रीफ यांना मानणारे संचालकांचा रोष अदृश्य शक्तीवर आहे. त्यामुळे सहाजिकच निवडणुकीतून त्यांचा रोष व्यक्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीतील पक्षाचा तोटा हा मुश्रीफ यांच्याच नावावर खपवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या अहवानांचे धनुष्य हसन मुश्रीफ यांना पेलावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com