Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील वाठार तर्फ वडगाव गावातील साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. ही जमीन गावाची असून, ती बेकायदेशीर पद्धतीने खोटी कागदपत्रे जोडून आणि फेरफार डायरीत खाडाखोड करून दिली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमोर आमदार अशोकराव माने यांना जाब विचारला.
जमीन परत मिळवण्यासाठी ग्रामस्थांचे 15 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू असून उपोषणाचा 18 वा दिवस होता. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी आमदार अशोकराव माने यांच्यावर ग्रामस्थानी प्रश्नांची सरबत्ती केली. दरम्यान, मराठा समाजाच्या जागेवरूनही माजी आमदार राजू आवळे आमदार अशोकराव माने यांच्यात बाचाबाची झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू असताना राजसंह भुजिंगे हे आमदार अशोकराव माने यांना म्हणाले, ‘तुमच्या प्रचारासाठी आम्ही गुडघ्याच्या वाट्या झिजवल्या. मात्र, तुम्ही आमची दखलही घेतली नाही. बापू हळूच गावात येतात. कुठेतरी बसतात आणि भजी खाऊन जातात. मात्र, आपल्या उपोषणाला भेट द्यायला त्यांना वेळ मिळाला नाही.’ भर मिटींगमध्ये असा थेट सवाल करण्यात आल्याने अशोकराव माने यांना काय बोलावं हे सुचत नव्हतं.
सुरुवातीला गावातील 200 पेक्षा जास्त मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयात आली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर ठिय्या मारला. त्यानंतर त्यांना ताराराणी सभागृहात जाण्यासासाठी सांगण्यात आले. तेथे सरपंच सागर कांबळे, ॲड. विनायक पाटील, बाबासाहेब दबडे, महेंद्र शिंदे यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. तसेच कशा प्रकारे फसवणूक केली ते सांगितले.
दरम्यान, आमदार अशोकराव माने यांनी एका संस्थेसाठी कोल्हापूर शहरात देखील मराठा समाजाचे असणारे जागा घेतली आहे. यावरून देखील कोल्हापुरातील मराठा समाजात आमदार माने यांच्याबाबत तीव्र नाराजी आहे. हा प्रश्न माजी आमदार राजू बाबा आवळे यांनी उपस्थित केल्यानंतर आमदार अशोकराव माने यांनी देखील त्याच्यावर आक्षेप घेत गोंधळ घातला. या संपूर्ण मीटिंगमध्ये हा विषय निघाल्यानंतर आजी आणि माजी आमदारांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. वेळीच हस्तक्षेप झाल्याने पुढचा अनर्थ टळला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.