Solapur, 20 November : सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदासंघासाठी ६५.४१ टक्के मतदान झाले असून ती गेल्या २०१९ च्या तुलनेत एक टक्क्याने वाढली आहे. गेल्या निवडणुकीत ६४. ५९ टक्के मतदान झाले होते. हा वाढलेला टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार, याची उत्सुकता वाढली आहे. सांगोला मतदारसंघात सर्वाधिक मतदान ७३. ५९ टक्के मतदान झाले असून सोलापूर शहर मध्य मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे ५३. ५६ टक्के मतदान झाले आहे.
दरम्यान, सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मतदानाची ही आकडेवारी सायंकाळी सहापर्यंतची आहे. त्यानंतर झालेल्या मतदानामुळे या टक्केवारीमध्ये वाढ होऊ शकते, त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत वाढ होणार, हे निश्चित आहे.
सोलापूर जिल्ह्यातील एकूण ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदार (Voter) होते, त्या पैकी २५ लाख १७ हजार ३७४ मतदारांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १३ लाख १७ हजार ३६४ पुरुष मतदार, तर ११ लाख ९९ हजार ९१२ महिला मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे महिलांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे पुरुषांच्या बरोबरीने मतदान केल्याचे स्पष्ट होते.
जिल्ह्यातील ११ मतदारसंघातून १८४ उमेदवार विधानसभा निवडणूक लढवित आहेत. मतदानाला आज सकाळी सातपासूनच सुरुवात झाली होती. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर सकाळपासून रांगा दिसून येत होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील मतदानाची टक्केवारीत वाढ झाल्याचे साधारणपणे सांगण्यात येत आहे.
विशेषतः जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर महिला मतदारांची मोठी रांग दिसून येत होती. सकाळच्या सत्रात थंडीचे प्रमाण होते, त्यामुळे शहरी मतदान केंद्रांवर तुरळक गर्दी दिसून येत होती. मात्र, ग्रामीण भागात सकाळपासून रांगा दिसत होत्या.
सोलापूर जिल्ह्यात मतदारसंघनिहाय झालेले मतदान
अक्कलकोट....... ६४.३३ टक्के
सोलापूर दक्षिण..... ५८. ३५ टक्के
सोलापूर शहर मध्य....५३. ३६ टक्के
सोलापूर शहर उत्तर.... ५६.६२ टक्के
मोहोळ................ ६८.६२ टक्के
माढा..... ७०. ३६ टक्के
करमाळा....... ६७.८५ टक्के
पंढरपूर....... ६८.९७ टक्के
बार्शी.......... ७२.५२ टक्के
माळशिरस.... ६५.६९ टक्के
सांगोला....७३.५९ टक्के
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.