Solapur Politic's : शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी; काडादींना पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना नेता कडाडला

Assembly Election 2024 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला आहे. भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.
Sharad Koli-Sushilkumar Shinde-Praniti Shinde
Sharad Koli-Sushilkumar Shinde-Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 20 November : सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना ऐन मतदानाच्या दिवशी पाठिंबा जाहीर करणारे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला. प्रणिती शिंदे या भाजपची बी टीम म्हणून काम करीत असून त्यांची भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे, यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही, असा इशारा कोळी यांनी दिला आहे.

ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde ) यांनी आज सकाळी मतदानानंतर सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना काँग्रेस पक्षाचा अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेने गडबड केली असून, त्यांनी घाईघाईने सोलापूर दक्षिण मतदारसंघात उमेदवार जाहीर केला आहे. हा मतदारसंघ पारंपारिक दृष्टीने काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, फक्त एकदा शिवसेनेचा उमेदवार निवडून आला, त्यावर त्यांनी मतदारसंघावर दावा केला आहे, असे शिंदे यांनी म्हटले होते.

शिंदे यांच्या निर्णयावर शिवसेनेचे उपनेते शरद कोळी (Sharad Koli) यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम आहेत. त्या भाजपचा प्रचार करतात. त्यांनी भाजपसोबत आतून हातमिळवणी केली आहे. मात्र, शिंदे कुटुंबाची ही शेवटची खासदारकी आहे, यापुढे तुम्हाला खासदारकी मिळणार नाही.

Sharad Koli-Sushilkumar Shinde-Praniti Shinde
Parli Constituency : ‘हाय व्होल्टेज’ लढत असलेल्या परळीत मतदान केंद्राध्यक्षांना हृदयविकाराचा झटका

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला आहे. भाजप उमेदवार सुभाष देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अपक्षाला मत म्हणजे भाजपला मत आहे. आपला उमेदवार हा अमर पाटील असून त्यालाच निवडून आणायचे आहे, असे आवाहन कोळी यांनी केले.

Sharad Koli-Sushilkumar Shinde-Praniti Shinde
Sushilkumar Shinde : ‘सोलापूर दक्षिण’मध्ये काँग्रेसने डाव टाकला; ठाकरेंना धक्का देत शिंदेंकडून अपक्ष काडादींना पाठिंबा जाहीर

लोकसभेत भाजपच्या आमदारांनी मदत केल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी प्रणिती शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी सोलापूरचा विकास केलेला नाही. शिंदे कुटुंबाने आमचे आभार मानण्याऐवजी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. ही माणसं धोकेबाज निघाली, गद्दारांकडून काय अपेक्षा करणार, असा सवालही शरद कोळी यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com