Bazar Samit Result :  Sarkarnma
पश्चिम महाराष्ट्र

Atpadi Bazar Samiti Result : आटपाडीत फिफ्टी-फिफ्टी; सत्ता कुणाची येणार ?

Atpadi Bazar Samiti Result : आटपाडीट भाजप सोबत राष्ट्रवादी तर शिंदेंच्या शिवसेनेसोबत काँग्रेसची आघाडी..

सरकारनामा ब्यूरो

Atpadi Bazar Samiti Result News : सांगली जिल्ह्यातील आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तेचा पेच निर्माण झाला आहे. कारण या ठिकाणी 18 पैकी नऊ-नऊ अशा सम-समान जागा दोन्ही आघाड्यांना मिळाल्या आहेत. त्यामुळे काठावरचे बहुमत मिळाल्याने आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेचा तिढा निर्माण झाला आहे. भाजप-राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट-काँग्रेस आघाडीमध्ये अत्यंत अटीतटीची लढत झाली आहे.

सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. हे बाजार समितीमध्ये 18 जागांसाठी अत्यंत चुरशीने निवडणूक पार पडली. 93% इतक्या मतदानाची नोंद झाली होती. भाजपा - राष्ट्रवादी आघाडी विरुद्ध शिवसेना शिंदे गट - काँग्रेस आघाडी या ठिकाणी मैदानात होती.

भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padalkar), माजी आमदार राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादीचे नेते हणमंतराव देशमुख हे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांची प्रतिष्ठा बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली होती. त्यामुळे काट्याची लढत या निवडणुकीच्या निमित्ताने झाली. त्यामध्ये 18 पैकी 9 -9 अशा जागा दोन्ही आघाड्यांना मिळाल्या आहेत.त्यामुळे कोणालाही स्पष्ट बहुमत मिळू न शकल्याने आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर नेमकी सत्ता कोणाची ? याचा पेच निर्माण झाला आहे. तर याचा तीढा आता सभापती निवडणुकीमध्येच सुटू शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे..

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेपासून या ठिकाणी भाजपाचे माजी आमदार राजेंद्र देशमुख गटाची सत्ता कायम राहिली आहे, यंदा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हणमंतराव देशमुख यांनी एकत्रित येत आघाडी केली होती. या आघाडीला शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांनी आव्हान दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT