Ahmednagar Crime News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला ; भाजप नगरसेवकावर गुन्हा दाखल

Ahmednagar Crime News : भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

-राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar : अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. अंकुश चत्तर असे हल्ला झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

या हल्याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शहरात सावेडी येथील एकविरा चौकात ही घटना घडली. (Latest Marathi News)

आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. रुग्णालयात अंकुश चत्तर यांच्या तब्येतीची माहिती घेतली. घटनेनंतर शहरातील सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड या परिसरामध्ये काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पाईपलाईन रोडवरील एकविरा चौकामध्ये ही घटना घडली. यावेळी या चौकामध्ये मोठी वर्दळ असते. मात्र वर्दळीच्या वेळेस दोन गटांमध्ये झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

शहर काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे म्हणाले, "नगर शहरांमध्ये गद्दार राष्ट्रवादी गट आणि भारतीय जनता पक्षाने गुंडांच्या टोळ्या पोसल्या आहेत, यातून या पद्धतीच्या गुन्हेगारी प्रवृत्ती शहरात फोफावली असून नागरिकांची जनजीवन दहशतीखाली आले आहेत." या गुंडांच्या टोळ्यांवर पोलिसांनी आता केवळ बघ्याची भूमिका न घेता कारवाई करावी अशी मागणी किरण काळे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

गेल्या महिन्यातच शहरांमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ता ओंकार भागानगरे यावर त्याने पोलिसांना अवैध धंद्याची माहिती दिल्याच्या कारणास्तव सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. यात ओंकार भागानगरेचा मृत्यू जागेवरच झाला होता. नगर शहरांमध्ये बाजारपेठेमध्ये व्यापारी आणि रोडवर व्यवसाय करणारे व्यावसायिक यांच्यामध्येही सशस्त्र हाणामारी झाल्याची घटना ताजी आहे.

भाजप आमदार नितेश राणे यांनी नगर शहरात येत सभा घेतली होती आणि पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईची मागणी केली होती. नुकतेच भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी तीन दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन नगर शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आणि अवैध धंद्यांबाबत माहिती देत जिल्हा पोलिसांना तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

फडवणीस यांनीही अधिकाऱ्यांना योग्य त्या कारवाईच्या आदेश देण्यात येतील, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिलं होते. आता पुन्हा एकदा शहराच्या सावेडी उपनगरात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर झालेल्या सशस्त्र हल्ल्याने नगर शहर आणि वाढत्या उपनगरातील एकंदरीत कायदा सुव्यवस्था कशी आहे याचं वास्तव समोर येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT