Mangalveda Bazar Samiti Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bazar Samiti Result : मंगळवेढ्यात आवताडेच 'बॉस' : बाजार समितीच्या सर्व १८ जागांवर वर्चस्व; राष्ट्रवादी तालुकाध्यक्षांना फक्त दोन मते

आवताडे काका-पुतणे बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व राखणार हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते.

हुकूम मुलाणी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : मंगळवेढा (Mangalveda) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी बबनराव अवताडे आणि आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) यांच्या नेतृत्वाखालील गटाचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले. संस्था मतदारसंघात राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षांना अवघी दोन मते पडून त्यांचा दारुण पराभव झाला. बाजार समितीच्या १८ सर्व जागा जिंकून बाजार समितीत अवताडे हेच अखेर बॉस ठरले आहेत. (Avtade group dominates Mangalveda Bazar Committee)

मंगळवेढा बाजार समितीच्या १८ जागांसाठी निवडणूक लागली होती. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अठरापैकी तेरा जागा बिनविरोध करण्यात आमदार समाधान आवताडे आणि त्यांचे काका बबनराव आवताडे यांना यश आले होते. हे काका-पुतणे बाजार समितीवर निर्विवाद वर्चस्व राखणार हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते.

दरम्यान, उर्वरीत पाच जागांसाठी आज मतदान झाले. पाच जागांमध्ये संस्था मतदारसंघातील दोन, तर ग्रामपंचायतमधील तीन अशा पाच जागांसाठी ९ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यांमध्ये होते. आज सलगर बुद्रूक, भोसे, मंगळवेढा या तीन मतदान केंद्रावर जवळपास ९२ टक्के मतदान झाले होते. मतदानानंतर लगेच सायंकाळी मतमोजणीही पूर्ण झाली.

संस्था मतदारसंघामध्ये 924 पैकी 800 मतदान झाले. त्यापैकी चार मते बाद झाली, संगीता कट्टे यांना अवघी दोन तर यांना कविता बेदरे, सविता यादव यांना प्रत्येकी 794 मते पडली. ग्रामपंचायतमध्ये एकूण 565 पैकी इतके मतदान झाले होते. त्यामध्ये जगन्नाथ रेवे 436, तर गंगाधर काकणकी 441, सोमनाथ माळी 101 यांना इतकी मते पडली. या प्रवर्गात सोमनाथ माळी यांचा पराभव झाला. ग्रामपंचायत विभागातील एका राखीव जागेसाठी पांडुरंग कांबळे 420, हौसाप्पा शेवडे 82, वैभव सोनवणे यांना फक्त एक मत पडले या प्रवर्गात पांडुरंग कांबळे हे विजयी झाले.पाच जागेसाठीच्या मतदानामध्ये आवताडे गटाचे पाचही उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले.

बाजार समितीच्या गत निवडणुकीतदेखील अवताडे गटाने १८ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले हेाते. यंदाच्या निवडणुकीत १३ जागा यापूर्वीच बिनविरोध केल्या होत्या. निवडणूकीतून पाच अशा 18 जागा जिंकून सहकारी संस्थेत आवताडे यांचे प्राबल्य कायम राहिले आहे. आवताडे कुटुंबाशी प्रामाणिक राहिलेल्या अनेक समर्थकांना या संस्थेत संचालक पदाची संधी दिली आहे.

दामाजी कारखान्याच्या निवडणुकीनंतर दुसरी मोठी सहकारी संस्था ताब्यात घेण्याचा समविचारीने प्रयत्न केला; परंतु पुरेशे मतदार नसल्यामुळे त्यांनी या निवडणुकीत माघार घेतल्याचे जाहीर केले. शेतकऱ्याशी संबंधित असलेल्या या सहकारी संस्थेवर मतमोजणीनंतर वर्चस्व आबाधीत राहिल्याबद्दल अवताडे समर्थक आणि फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT