भोर (जि. पुणे) : भोर (Bhor) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar Samiti) निवडणुकीची मतमोजणी शहरातील प्राथमिक शिक्षक सहकार भावनांमध्ये सुरू झाली आहे. विकास सोसायटी मतदार संघात सत्ताधारी काँग्रेस पक्षाचे (Congress) उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. परंतु ग्रामपंचायत मतदार संघात काँटे की टक्कर सुरू आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह (NCP) इतर पक्षांच्या आघाडीच्या उमेदवारांमध्ये फक्त काही मतांचा फरक जाणवत आहे. (Counting of Bhor Bazar Samiti election has started)
भोर बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना दोन्हा गट एकत्र आले आहेत. या सर्वपक्षीयांनी सत्ताधारी थोपटे गटापुढे आव्हान उभे केले आहे. बाजार समितीसाठी ९८ टक्के चुरशीने मतदान झाले होते. त्याची मतमोजणी सुरू झाली आहे. त्या मतमोजणीतील काही कल जाहीर झाले आहेत.
काही मतदान केंद्राच्या मतमोजणीत थोपटे आणि सर्वपक्षीयच्या उमेवारांना समान मते मिळताना दिसत आहेत. ग्रामपंचायत मतदार संघात सत्ताधारी काँग्रेस पक्षाला झगडावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे. कारण सोसायटी गटात थोपटे यांचे निर्विवाद वर्चस्व असले तरी ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे संख्याबळ मोठे आहे. त्यामुठे याच मतदारसंघात दोन पॅनेलमध्ये काँटे की टक्कर होण्याची चिन्हे आहेत. त्याचे प्रतिबिंब निकालाच्या पहिल्या कलामध्ये दिसून येत आहे.
मतमोजणीसाठी आठ टेबल लावण्यात आलेले असून बंदोबस्तासाठी चार अधिकारी आणि ४० पोलीस कर्मचारी तैनात आहेत. यामध्ये रिझर्व पोलीस फोर्स च्या १० जवानांचा समावेश आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पी. टी. घुगे यांनी सांगितले
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.