Abhijeet Patil-Babanrao Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Abhijeet Patil : बबनदादांना ‘विठ्ठल’ची बॅलन्सशीट तपासण्याचा अधिकार नाही; अभिजीत पाटलांनी खडसावले

Madha Assembly Election : विठ्ठल सहकारी कारखाना अडचणीत आहे. विजय शुगरच्या माध्यमातून २३ कोटी रुपये आपल्याकडे देणं आहे. आमदार बबनराव शिंदे यांनी देऊन टाकावं. म्हणजे आमचा (विठ्ठल कारखान्याचा) तोटाही कमी होईल.

Vijaykumar Dudhale

Solapur, 03 October : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची बॅलन्सशीट तपासण्याचा अधिकार आमदार बबनराव शिंदे यांना नाही. कारण, ते माझ्या कारखान्याचे सभासद नाहीत. विजय शुगरच्या माध्यमातून विठ्ठल कारखान्याचे २३ कोटी रुपये अडकले आहेत. आमदार शिंदे यांना एवढाच कळवळा असेल तर त्यांनी ते पैसे द्यावेत, असे आव्हान विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी आमदार बबनराव शिंदे यांना दिले.

अभिजीत पाटील (Abhijeet Patil) हे माढा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. त्याचदरम्यान त्यांनी विठ्ठल साखर कारखान्यात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर देण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यावर इतर कारखान्याच्या अध्यक्षांकडून टीका होत आहे.

आमदार बबनराव शिंदे (Babanrao Shinde) यांनी विठ्ठल कारखान्याची बॅलन्सशीट तपासली. त्यात विठ्ठल कारखाना ३४ कोटी रुपयांनी तोट्यात असल्याचे दिसून आले. त्यबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अभिजीत पाटील यांनी विजय शुगरच्या माध्यमातून आमदार शिंदे यांच्याकडे असलेले २३ कोटी रुपयांचे देणे द्यावे, असे आव्हान दिले आहे. विजय शुगर कारखाना आमदार बबनराव शिंदे यांनी विकत घेतला आहे.

अभिजीत पाटील म्हणाले, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २५०० रुपये दर देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार मी बंद पडलेला कारखाना सुरू करून तो २५०० रुपये दर दिला. आताही उसाला ३५०० रुपये दर जाहीर केला आहे, आताही मी तो दर देऊ शकतो. मात्र, इतर कारखानदारांना तो दर द्यायचा नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप करत आहेत.

विठ्ठल कारखान्याची मागची (मी सत्तेत येण्यापूर्वीची) ४० कोटी रुपये बाकी होती, ती देणी मी दिले आहे. विठ्ठल कारखान्याचे २३ कोटी रुपये विजय शुगरच्या माध्यमातून अडकले आहेत, त्यांना शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर आमदार बबनराव शिंदे यांनी देऊन टाकावे, असे आव्हानही अभिजीत पाटील यांनी दिले.

अभिजीत पाटील म्हणाले, आपल्या शेजारचा कारखाना आहे. त्या भागातील १५ वर्षे आपण मतं खाल्ली आहेत. विठ्ठल सहकारी कारखाना अडचणीत आहे. विजय शुगरच्या माध्यमातून २३ कोटी रुपये आपल्याकडे देणं आहे. आमदार बबनराव शिंदे यांनी देऊन टाकावं. म्हणजे आमचा (विठ्ठल कारखान्याचा) तोटाही कमी होईल. आणि माझ्या कारखान्याची बॅलेन्स शीट तपासण्याचा त्यांना अधिकार नाही. कारण ते विठ्ठल कारखान्याचे सभासदही नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT