jaywantrao jagtap-Digvijay Bagal Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karmala Politic's : मागील निवडणुकीतील सख्खे मित्र बागल-जगताप यंदा बनले कट्टर विरोधक

Nagar Parishad Election 2025 : करमाळा नगरपरिषद निवडणुकीत जगताप व बागल गट पुन्हा पारंपरिक विरोधक म्हणून आमनेसामने. तिरंगी लढतीमुळे राजकीय चुरस वाढून निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अण्णा काळे

करमाळा नगरपरिषद निवडणुकीत जगताप, बागल आणि सावंत-देवी या तिन्ही गटांमध्ये तिरंगी लढत होत असून जोरदार चुरस आहे.
२०१६ मध्ये जगताप-बागल गटांनी एकत्र येत सत्ता मिळवली होती, परंतु काही महिन्यांतच त्यांची युती तुटून ते पुन्हा विरोधी भूमिका घेत आहेत.
या वेळी अनेक नेत्यांनी गटबदल केले असून भाजपही मजबूतपणे मैदानात असल्याने लढत अधिकच रंगतदार झाली आहे.

Karmala, 22 November : करमाळा नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत होत असून मोठी चुरस निर्माण झाली आहे. नगरपरिषदेच्या २०१६ मधील निवडणुकीत करमाळा शहरात अनपेक्षितपणे जगताप आणि बागल गट एकत्र आले होते. वास्तविक जगताप आणि बागल हे पारंपरिक विरोधक असतानाही हे दोघे एकत्र येणे हे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होते. मात्र, निकालानंतर अवघ्या काही महिन्यांतच बागल आणि जगताप यांची फिस्कटली. तेव्हापासून ते पुन्हा एकदा पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेत कायम आहेत.

करमाळा (Karmala) नगरपरिषेदच्या २०१६ च्या निवडणुकीत बागल गटाकडून (राष्ट्रवादी काँग्रेस) विजयी झालेले अल्ताफ तांबोळी, संगीता खाटेर व श्रीनिवास कांबळे यांनी या वेळी जगताप गटात प्रवेश केला आहे. यापैकी अल्ताफ तांबोळी, संगीता खाटेर या निवडणूक रिंगणात असून श्रीनिवास कांबळे यांचे चिरंजीव निखिल कांबळे व अल्ताफ तांबोळी यांच्या पत्नी शबाना तांबोळी हे जगताप गटाकडून निवडणूक लढवत आहेत.

करमाळा तालुक्याच्या राजकारणात १९९५ पासून जगताप आणि बागल हे दोन गट कायम एकमेकांच्या विरोधात सर्व निवडणुका लढत राहिले. सन २०१६ मध्ये माजी आमदार जयवंतराव जगताप (jaywantrao jagtap) व दिग्विजय बागल, रश्मी बागल यांच्यात बैठका झाल्या आणि त्यातून बागल, जगताप एकत्र आले. या निवडणुकीत बागल- जगताप (काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध शहर विकास आघाडी देवी गट, सावंत गट एकत्र अशी ही निवडणूक झाली.

आता होणाऱ्या निवडणुकीत शहर विकास आघाडीमधील सावंत व देवी स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. सावंत हे नगराध्यक्षपदासह २० उमेदवार लढवत आहेत. तर कन्हैयालाल देवी हे भाजपमध्ये गेले असून त्यांच्या पत्नी सुनीता देवी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. तर बागल हे भाजपमध्ये आहेत.

त्या २०१६ च्या निवडणुकीत जगताप गटाचे वैभवराजे जगताप नगराध्यक्ष झाले आणि ४ नगरसेवक निवडून आले होते. बागल गटाचे ७ सात उमेदवार विजयी झाले होते. करमाळा नगरपालिकेच्या २०१६ च्या निवडणुकीत बागल व जगताप यांनी एकत्र प्रचार यंत्रणा राबवली. माजी आमदार जगताप, बागल गटाचे नेते रश्मी बागल, दिग्विजय बागल यांनी प्रचाराची धुरा सांभाळली.

बागल-जगताप यांच्या विरोधात माजी आमदार संजयमामा शिंदे, विलासराव घुमरे, कन्हैयालाल देवी, सावंत गटाचे सुनील सावंत, संजय सावंत यांनी शहर विकास आघाडीतून लढत दिली होती. याशिवाय भाजपकडून गणेश चिवटे व शिवसेनेकडून महेश चिवटे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती.

Q1: करमाळा नगरपरिषदेत कोणत्या गटांमध्ये लढत आहे?
जगताप गट, बागल गट आणि सावंत-देवी गट तिरंगी लढत लढवत आहेत.

Q2: २०१६मध्ये जगताप-बागल युतीचा काय परिणाम झाला होता?
त्यांनी सत्ता मिळवली परंतु अल्पावधीत युती तुटली.

Q3: या निवडणुकीत कोणते महत्त्वाचे नेते गट बदलले आहेत?
अल्ताफ तांबोळी, संगीता खाटेर आणि श्रीनिवास कांबळे यांनी जगताप गटात प्रवेश केला आहे.

Q4: भाजपची भूमिका काय आहे?
भाजपकडून कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी लढवत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT