Solapur Politics : माजी मंत्र्याला शिवसेना प्रवेशानंतरही शांतता नाही; भाजप आमदार मुक्काम ठोकून दुसरा धक्का देण्याच्या तयारीत

Solapur Politics : बाजार समिती निवडणुकीनंतर माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांना दुधनी नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून दुसरा धक्का देण्याचा इरादा भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा आहे.
BJP MLA Sachin Kalyanshetti prepares to challenge Siddharam Mehtre in Dudhani Municipal Election.
BJP MLA Sachin Kalyanshetti prepares to challenge Siddharam Mehtre in Dudhani Municipal Election.Saekarnama
Published on
Updated on

Solapur Politics : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील दुधनी नगरपरिषद निवडणुकीच्या थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक तिरंगी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. माजी गृहराज्यमंत्री व 17 वर्षे आमदार असलेले सिद्धाराम म्हेत्रे यांच्या होमपिचवरील या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. ''सिद्धारामअण्णांचा'' दांडगा अनुभव व संपर्क यशस्वी ठरणार की ''आमदार सचिन कल्याणशेट्टी'' यांची शांत, संयमी स्वभाव व प्रसंगी आक्रमक व्यूहरचना यशस्वी ठरणार? याकडे संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांनीही दुधनीमध्ये ''चमत्कार'' घडण्याचा दावा केला आहे.

अक्कलकोट तालुक्यामध्ये दुधनी, मैंदर्गी व अक्कलकोट अशा तीन नगरपरिषदा आहेत. दुधनी नगरपरिषद ही महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील असून या नगरपरिषद निवडणुकीसाठी एकूण मतदारसंख्या 10 हजार 905 आहे. एकूण 10 प्रभाग असून नगरसेवकांची संख्या 20 आहे. दुधनी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद खुले झाले असल्याने या ठिकाणी मातब्बर नेत्यांना संधी मिळाली आहे. दुधनी नगरपरिषदेच्या 20 नगरसेवकांमध्ये आरक्षणनिहायहाय नगरसेवक संख्या एसी प्रवर्ग 2, एसटी 1, ओबीसी प्रवर्ग 5 व खुला प्रवर्ग 12 अशी आहे.

दुधनीच्या थेट नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून युवकचे जिल्हाप्रमुख प्रथमेश शंकर म्हेत्रे, भाजपकडून अतुल मेळकुंदे व काँग्रेसतर्फे महेश शांतय्या बाहेरमठ (स्वामी), राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र कोंडिबा इंगळे, बसपाच्या रेखा संतोष गद्दी आदी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तरीसुद्धा प्रमुख ३ उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात राहणार असल्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

BJP MLA Sachin Kalyanshetti prepares to challenge Siddharam Mehtre in Dudhani Municipal Election.
Solapur ZP Election : बळिराम साठेंविरोधात रणशिंग फुंकले; दिलीप माने, यशवंत माने अन्‌ शहाजी पवारांची एकत्र खलबत

दुधनी नगरपरिषदेसाठी पारंपारिक विरोधकांत लढत होणार असून यंदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केलेले सिद्धाराम म्हेत्रे यांच्या शिवसेना व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या भाजपमध्ये संघर्षपूर्ण लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. येथे काँग्रेसची ताकद नगण्य झाली असली तरी त्यांनी ''जातीय समीकरणे'' विचारात घेऊन योग्य उमेदवार दिला आहे. दुधनी नगरपरिषदेसाठी नेहमी काँग्रेस व भाजप तुल्यबळ लढती होत होत्या. मात्र, सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे व प्रथमेश म्हेत्रे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने या ठिकाणी शिवसेना बलाढ्य पक्ष म्हणून पुढे आला आहे.

BJP MLA Sachin Kalyanshetti prepares to challenge Siddharam Mehtre in Dudhani Municipal Election.
Akkalkot Politic's : अक्कलकोटमध्ये मल्लिकार्जून पाटील, शिवानंद पाटलांना धक्का; आनंद तानवडे, कल्याणशेट्टींच्या काकूंचा ZPचा मार्ग मोकळा!

दुधनीमध्ये शंकर म्हेत्रे व प्रथमेश म्हेत्रे यांच्या बलाढ्य ताकतीपुढे टिकाव धरण्यासारखे नेतृत्व तयार करण्यासाठी भाजप सामान्य, जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली आहे. या ठिकाणी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना निवडणुकीची धुरा सांभाळावी लागणार आहे. यासाठी आमदार कल्याणशेट्टी दुधनीमध्ये ठाण मांडून बसण्याची शक्यता आहे. या ठिकाणची खरी लढत म्हेत्रे परिवार विरुद्ध आमदार कल्याणशेट्टी अशीच होणार आहे. दुधनी भाजपमध्ये नाराजी असून भाजपमधील नाराजीचा फायदा काँग्रेसला होईल व आम्ही नक्की यश मिळवू, असा दावा काँग्रेसचे उमेदवार महेश बाहेरमठ यांनी केला.

BJP MLA Sachin Kalyanshetti prepares to challenge Siddharam Mehtre in Dudhani Municipal Election.
Akkalkot Congress : मेळाव्यात म्हेत्रे टार्गेट; ‘कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी काँग्रेस सोडणाऱ्यांना पश्चाताप होईल’

बाजार समितीनंतर महत्त्वाची लढाई

आमदार कल्याणशेट्टी (Sachin kalyanshetti) यांनी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत चाणक्यनितीने सिद्धाराम म्हेत्रे यांचा पराभव केला होता. स्थापनेपासून म्हेत्रे परिवाराच्या ताब्यात असलेला हा गड ढासळल्यामुळे म्हेत्रे समर्थकांमध्ये नैराश्य पसरलेले होते. आता पुन्हा दुधनीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत म्हेत्रे परिवारातील उमेदवार असल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीत म्हेत्रे परिवारातील सदस्य असलेल्या उमेदवाराचा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यास म्हेत्रे यांच्या भविष्यातील राजकारणात मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. त्यामुळे म्हेत्रे यांच्या अस्तित्वाची ही लढाई बनली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com