Nagpur Congress Rally News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Nagpur Congress Rally News : नागपूरच्या काँग्रेस महासभेला नगरमधून 10 हजार कार्यकर्ते? बाळासाहेब थोरातांचे शक्तिप्रदर्शन!

Pradeep Pendhare

Ahmednagar News : अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा 138 वा स्थापना दिनानिमित्ताने नागपूरमध्ये उद्या, गुरुवारी (28 डिसेंबर) सभा होत आहे. या सभेची महाराष्ट्र काँग्रेस पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी विशेष करून पुढाकार घेतला आहे. या सभेसाठी नगर जिल्ह्यात जोरदार तयारी करण्यात आली आहे. या सभेसाठी नगर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते जाणार आहेत. (Latest Marathi News)

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 138 व्या स्थापना दिनानिमित्ताने नागपूर येथील सभेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह राज्यातील नेते उपस्थित राहणार आहे.

संगमनेर येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथे अहमदनगर जिल्हा काँग्रेसतर्फे नागपूर सभेसाठी नियोजन बैठक झाली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव धीरज गुजर, योगेंद्र बंटी पाटील, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, करण ससाणए, हेमंत ओगले, नगर शहराध्यक्ष किरण काळे, ज्ञानदेव वाफारे यावेळी उपस्थित होते.

धीरज गुजर म्हणाले, 'काँग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद असताना राधाकृष्ण विखे यांनी पक्ष सोडला. अशा परिस्थितीत आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाची धुरा अत्यंत सक्षमपणे संभाळली. काँग्रेस पक्षाला सन्मानजनक परिस्थितीमध्ये आणून ठेवले. तसेच 44 आमदारही निवडून आणले. अडचणीच्या काळात ज्या नेत्यांनी काँग्रेस पक्षाला साथ दिली, अशाच नेत्यांना जनता कायम लक्षात ठेवते.'

आमदार कानडे यांनी दावा केला आहे की, नगर जिल्ह्यातून 10 हजार कार्यकर्ते नागपूरला रवाना होणार आहेत. नगर जिल्ह्यामध्ये आमदार थोरात यांनी कायमच पक्षाला बळ देण्याचे काम केले आहे. पुढील काळामध्ये महाविकास आघाडीला चांगले दिवस येतील, असे सांगितले. राजेंद्र नागवडे यांनी नागपूरला जाण्यासाठी नगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नियोजन करण्यात आल्याची माहिती दिली. नगर जिल्ह्यामध्ये सध्या काँग्रेससाठी अतिशय चांगले वातावरण असून प्रत्येक तालुकाध्यक्षांनी मोठ्या ताकदीने कामला लागावे, असे आवाहन केले. शहराध्यक्ष किरण काळे, हेमंत ओगले, कारण ससाणे, राजेंद्र वाघमारे यांची भाषणे झाली.

महासभेतून राज्यात काँग्रेसला बळ

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. दोन्ही पक्ष फुटले. फुटलेले भाजप महायुती सत्तेत जाऊन बसले. काॅंग्रेस मात्र एकसंघ राहिला. काॅंग्रेसमध्ये देखील असाच प्रयोग होणार असे बोलले जात आहे. भाजपकडून देखील काॅंग्रेसचे दिग्गज नेते संपर्कात असल्याचे बोलले जात होते. परंतु प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. काॅंग्रेस राज्यात अजूनतरी एकसंघ राहिला आहे. राज्यात काॅंग्रेसचे 43 आमदार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात या महासभेच्यानिमित्ताने शक्तिप्रदर्शन करत आहे. काॅंग्रेसला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी ही महासभा लोकसभेच्या तोंडावर उपयुक्त ठरणार असल्याचे विश्लेषक सांगत आहेत.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT