Bhanudas Murkute: 'बाळासाहेब थोरात हसले तरी...'; माजी आमदार मुरकुटेंचा टोला अन् एकच हशा

Balasaheb Thorat:'...म्हणून आपण राजकारणात टिकलो', आमदार भानुदास मुरकुटेंची स्पष्टोक्ती
Bhanudas Murkute
Bhanudas MurkuteSarkarnama
Published on
Updated on

महेश माळवे

Ahmednagar News: श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासमोर केलेले धमाकेदार भाषण चर्चेत आले आहे. "बाळासाहेब थोरात हसले तरी लोकांना वाटते ते आपल्याकडेच पाहून हसले, यातून त्यांचे राजकारण सोपे होते. मात्र, आपल्याला बाह्या वर केल्याशिवाय राजकारण करताच आले नाही,"अशी मिश्किल स्पष्टोक्ती माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी देताच एकच हशा पिकला.

खंडकरी चळवळीचे नेते माधवराव गायकवाड स्मृतिदिन व जन्मशताब्दी वर्षानिमित्त माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला. या वेळी बोलताना मुरकुटे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचे रहस्य उलगडले. या वेळी कारभारी उगले, डॉ. भालचंद्र कांगो, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, भाऊसाहेब कांबळे, आमदार लहू कानडे, करण ससाणे उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhanudas Murkute
Cabinet Expansion : राज्य दुष्काळात अन् शिंदेंच्या आमदाराचं मंत्रिपदासाठी पंढरीच्या विठोबाला साकडं; पावणार का...?

व्यासपीठावर उपस्थित आमदार थोरात यांच्याकडे पाहत मुरकुटे म्हणाले, "थोरात यांचे हसणे त्यांचे राजकारण सोपे करते, त्यांना कधीच बाह्या वर कराव्या लागल्या नाहीत. राजकारणात साम, दाम, दंड, भेद या गोष्टींचा वापर करावा लागतो. मात्र, राजकीय पार्श्वभूमी नसल्यामुळे आपल्याला राजकारणात यायचं असलं तरी दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या. पहिली म्हणजे आगाऊपणा आणि दुसरी म्हणजे बाह्या वर करून दोन हात करणे. त्यामुळे आपण कायम बाह्या वर ठेवल्यामुळे राजकारणात टिकलो," असे त्यांनी स्पष्ट केले.

खंडकरी चळवळीविषयी बोलताना मुरकुटे म्हणाले, "माधवराव गायकवाड, अण्णासाहेब थोरात व इतर सर्व कॉम्रेड मंडळींनी जेव्हा जेव्हा कारखान्याने जमिनी कराराने घ्यायच्या ठरविल्या, त्याला त्यांनी विरोध केला. तुम्ही जमिनीचा करार करायचा नाही.

कारखान्याने करार करायचा नाही, सांगितले असता आम्ही माघार घेतली व या चळवळीला पाठिंबा दिला. तसे पाहिले तर गायकवाड हे मनमाडचे, ज्यांचा श्रीरामपूरशी काहीही संबंध नाही. मात्र, चळवळ म्हटली तर स्वार्थ असतोच. परंतु कुठलाही स्वार्थ न ठेवता 52 ते 55 वर्षे खंडकरी चळवळ त्यांनी चालवली व ती यशस्वी करून दाखविली," असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

Edited by Ganesh Thombare

Bhanudas Murkute
Rohit Pawar On Bhujbal:'...पण भुजबळांनी ओबीसी कल्याण खाते सांभाळले नाही'; रोहित पवारांचा टोला

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com