Balasaheb Thorath : काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला होता. विधानपरिषद निवडणूक व अपक्ष आमदार सत्यजीत तांबेंबाबत नाशिक पदवीधर निवडणुकी दरम्यान काँग्रेसमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडून आले. दरम्यान थोरात यांनी राजीनामा दिल्याने काँग्रेस अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचे स्पष्ट होत होते, अनेक दिवस थोरात यांनी मौन बाळगल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. आता काँग्रेस प्रभारी एच के पाटील (H K Patil) यांनी थोरातांची भेट घेऊन, सविस्तर चर्चा केली आहे.
काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील आणि काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची आज नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीनंतर एच के पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्ष आणि विधानपरिषद निवडणुकी दरम्यानच्या बाबींवर भाष्य केले. तसेच निर्माण झालेले वाद काँग्रेस अंतर्गत वाद हे कुटुंबातील असून, यावर मार्ग शोधले जातील असे पाटील म्हणाले.
एच के पाटील म्हणाले, "आमच्या पक्षाचे नेते थोरात यांना भेटण्यासाठी मी इथे आलो. यावेळी सविस्तर चर्चा झाली. त्यांच्या भावना मी समजून घेतल्या. काही गैरसमजांवर ही स्पष्टीकरण मिळाले. ही काँग्रेसच्या कुटुंबातील बाब आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत.आणि थोरात काँग्रेस पक्षाची रायपूर येथील सेशनला उपस्थित राहणार आहेत. तसेच ते राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची ही भेट घेणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
'इथे येण्याआधी मी काँग्रेसचे अध्यक्षांची भेट घेतली होती. काँग्रेसमध्ये जे काही मधल्याकाळात मतभेद निर्माण झालेत त्यावर चिंतन करून, या गोष्टी सोडवणार आहोत. ही आमच्यातली अंतर्गत बाब आहे. त्याचा आम्ही आमच्या स्तरावर निपटारा करू. पक्षाचे जे काही कार्यक्रम आहेत, त्यात थोरात सहभागीहोतील. ते काँग्रेस अध्यक्षांना भेटून सविस्तरपणे बोलतील. विधिमंडळ नेते पदाचा राजीनामा आम्ही मागे घेण्याची आम्ही थोरातांना विनंती केली आहे. सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या आहेत, असे स्पष्टीकरण पाटील यांनी दिले.
अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांच्या मुद्दा उपस्थित झाल्यावर पाटील म्हणाले, सत्यजित तांबेचा विषयच नव्हता. आम्ही तांबेवर कसलीही चर्चा केलेली नाही. त्यांचा अपक्ष अर्ज , त्यांची निवडणूक कसल्याही गोष्टीवर चर्चा झालेली नाही. "तसेच, नाना पटोले यांच्याशी थोरातांचे मतभेद यावर प्रश्न विचारले असता, पाटील म्हणाले, "सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तपणे नाही सांगू शकत. यावर आम्ही सखोल पणे चर्चा केलेली नाही. नाना पटोले यांच्याशी अजून चर्चा झालेली नाही. मात्र लवकरच ते होईल.
पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर, बाळासाहेब थोरात म्हणाले, "ग्रेस कुटुंबातल्या अंतर्गत बाबी आहेत. पाटील यांनी माझ्याशी सविस्तर चर्चा केली. काँग्रेसच्या रायपूरच्या परिषेदेसाठी मी उपस्थित राहिलं पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी मी पक्षाचे अध्यक्ष, नेते राहुल गांधी, नेत्या सोनिया गांधी यांच्यासमोर सविस्तर चर्चा करणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.