Balasaheb Thorat News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Balasaheb Thorat News : ''महाराष्ट्रातील सरकार म्हणजे, घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजी''

Nana Patole News : महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही

सरकारनामा ब्यूरो

Congress News : महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही, फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ट नेते बाळासाहेब थोरात यांनी दिला.

सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्याला कर्नाटचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते.

थोरात म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. जत भागातील पाणी प्रश्नावर कर्नाटक सरकार मदत करणार असल्याचे आश्वासन दिले त्याबद्दल आभारी आहोत. सीमाभागातील लोकांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होणार नाही, याचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही यावेळी त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना केले.

या वेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भाजपा (BJP) आपल्या देवीदेवतांचाव वापर फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठी करत असतो. निवडणुका होताच याच देवांचा अपमान करतो. कर्नाटकात भाजपाला भगवान श्रीराम व बजरंगबली यांनीच जागा दाखवून दिली. आता आदिपुरुष चित्रपटात भगवान श्रीराम व हनुमानाचा अपमान केला.

तसेच पंढपूरात जागोजागी पोस्टर लावले आहेत त्यातही पांडुरगांचा अपमान केला आहे. हे सरकार आपल्या दैवतांचा अपमान करत आहे, जनतेचा अपमान करत आहे. पांडुरंगाचा अपमान करणारे बोर्ड तातडीने काढून टाका, असेही पटोले म्हणाले. छत्तिसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेस (Congress) विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहेत.

नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपाच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आला, आरक्षण संपवले. धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय मिळवत महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प आहे, असे पटोले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT