Russia News : रशियातील बंड थोपवण्यात पुतिन यांना यश; या अटींवर झाला तह?

Vladimir Putin News : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या जवळचे असलेले झिबिग्नी प्रिगोझिव्ह यांनी बंड केले होते.
Vladimir Putin
Vladimir PutinSarkarnama
Published on
Updated on

Russia News : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्या जवळचे असलेले झिबिग्नी प्रिगोझिव्ह यांनी बंड केले होते. मात्र, हे बंड पेल्यातील वादळ ठरले आहे. पुतिन यांना हे बंड थोपवण्यामध्ये यश आले आहे. वॅग्नर ग्रुपचे सैनिक रशियातील वेगवेगळी शहर ताब्यात घेतल्याचा दावा करत होते. मात्र, बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांच्या मध्यस्थीने तोडगा निघाला.

या बंडामध्ये जे जे गुंतले असतील, त्या सर्वांना शिक्षा करण्याची आक्रमक भाषा पुतिन यांनी घेतली होती. वॅग्नर ग्रुप आणि पुतिन यांच्यामध्ये तहामध्ये झाला. या तहामध्ये पुतिन यांनीही काहीशी मवाळ भूमिका घेतली. बंड करणाऱ्या वॅग्नर ग्रुपला किंवा त्या ग्रुपचा प्रमुख प्रिगोझिनला देशद्रोह किंवा कायदेशीर कारवाईपासून अभय देण्यास पुतिन यांनी मान्यता दिली.

Vladimir Putin
Sanjay Raut slams Shambhuraj Desai : बाळासाहेब देसाईंच्या नातवानं शेण खाल्लं ; राऊतांनी शंभूराज देसाईंना डिवचलं..

त्यामुळे हा ग्रुप, स्वत: प्रिगोझिन रशियातून (Russia) निर्भयपणे आपल्या तळावर परतू शकणार आहे. रशियामध्ये रक्तपात होऊ नये हेच पुतिन यांचे सर्वोच्च ध्येय होते. म्हणून त्यांनी प्रिगोझिन व त्याच्या सैन्याला जाऊ दिले, असे स्पष्टीकरण पुतिन सरकारकडून देण्यात आले.

रशियातील वादात बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर ल्युकाशेंको यांनी पुतिन यांच्या बाजूने भूमिका मांडली. वॅग्नर ग्रुप वेगाने मॉस्कोच्या दिशेने सरकत असल्याचे पाहाताच ल्युकाशेंको यांनी या वादात मध्यस्थीची तयारी दाखवली होती. त्यानुसार, पुतिन यांच्या सहमतीने ल्युकाशेंको यांनी प्रिगोझिनशी वाटाघाटी केल्या.

Vladimir Putin
Parbhani Loksabha News : परभणी लोकसभा शिंदेंची शिवसेनाच लढवणार, पहिल्यांदाच घेतली जाहीर भूमिका..

दरम्यान, ल्युकाशेंको यांनी जाहीर केलेल्या निवेदनानुसार, पुतिन यांच्याशी चर्चा करुन वादावर तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू केली होती. एकीकडे वॅग्नर ग्रुपचे सैनिक मॉस्कोच्या दिशेने जात असताना दुसरीकडे प्रिगोझिन ल्युकाशेंको यांच्याशी वाटाघाटी करत होता. शनिवारी दिवसभर या वाटाघाटी चालल्याचे ल्युकाशेंको यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले.

या वाटाघाटी पार पडल्यानंतर प्रिगोझिन सैन्य माघारी घेण्यास तयार झाले. रशियामध्ये रक्तपात सुरू करणे हे कोणत्याही परिस्थितीत अमान्य असल्याची भूमिका दोन्ही बाजूंनी घेतली होती. त्यानुसार, वॅग्नर ग्रुपला माघारी फिरण्याचे आदेश देण्यात आले.

Vladimir Putin
Siddaramaiah News : कर्नाटक प्रमाणे शिंदे-फडणवीस सरकारलाही मुळासकट बाजूला करा! सिद्धरामय्यांचा सांगलीतून हल्लाबोल

पुतिन यांनाच आव्हान देणारे हे बंड काही मोजक्याच अटींवर थंड झाले. या तहानुसार, प्रिगोझिन व त्यांच्या वॅग्नर ग्रुपच्या सैनिकांवर देशद्रोहाची कारवाई केली जाणार नाही. पुतिन यांनी सर्वांना शिक्षा करण्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र, त्यांनी माघार घेतली.

या तहानुसार, रशियात घुसलेले वॅग्नर सैन्य माघारी फिरून पुन्हा युक्रेनमधील आपल्या तळावर रुजू होईल. ग्रुपचा प्रमुख प्रिगोझिन हा बेलारूसमध्ये निघून जाईल. वॅग्नर ग्रुपमधल्या ज्या सैनिकांनी या बंडामध्ये सहभाग घेतला नाही, त्यांना रशियन संरक्षण मंत्रालयाकडून नोकरीची संधी देण्यात येईल, असे रशियन सरकारकडून जाहीर करण्यात आले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com