Satej Patil, Amal Mahadik  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडींना मारहाण प्रकरण तापले, आता...

Police : पोलिसांनी माजी नगरसेवक डॉ.संदीप नेजदार यांच्यासह सात ते आठ जणांना अटक केली

Rahul Gadkar

Kolhapur : कोल्हापुरातील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस यांना आमदार सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अमानुष मारहाण केली. यामध्ये चिटणीस जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक डॉ. संदीप नेजदार यांच्यासह सात ते आठ जणांना अटक केली. चिटणीस यांना माराहाण केल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत.

मारहाणीच्या निषेधार्थ राज्यभरातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये कार्यकारी संचालक म्हणून काम करणाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशनने साखर आयुक्तांना काम बंदचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांची एक प्रकारे सेवा करणाऱ्या कार्यकारी संचालकांवर हल्ला करण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. कारखान्यामधील हजारो कर्मचारी, शेतकरी सभासद, ऊस तोडणी कामगार, कारखाना व्यवस्थापन आणि शासनामधील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्यकारी संचालक काम करत असतात. पण, कार्यकारी संचालकाला कोणतेही संरक्षण नसल्यामुळे अनेकदा दमदाटी, अपमान सहन करावा लागतो. पण कोल्हापुरात घडलेला हा प्रकार म्हणजे कार्यकारी संचालक पदाचा अवमान आहे, असे महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशननेने साखर आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रकाश चिटणीस यांना झालेल्या अमानुष मारहाणीमुळे सर्वच सहकारी साखर कारखान्यांमधील कार्यकारी संचालक संतप्त आहे. मारहाण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी अन्यथा काम बंद आंदोलन करून उपोषणाला बसण्याचा इशारा असोसिएशनने दिला आहे. साखर आयुक्तांना दिलेल्या पत्रावर अध्यक्ष राजेंद्र रणवरे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी आणि सेक्रेटरी संजीव देसाई यांच्या सह्या आहेत.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT