Mumbai News : नव्या महिला धोरणाला आज राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यात साखर कारखान्यांमध्ये महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवण्याचा तरतूद असणार आहे. महिलांना साखर कारखान्यात 30 टक्के प्रतिनिधीत्व देणाऱ्या साखर कारखान्यांवर सरकारकडून सवलतींचा वर्षाव होणार आहे. आज सायंकाळी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (30 percent seats will be reserved for women in sugar factories)
राज्य सरकारच्या आज (ता. 19 डिसेंबर) सायंकाळी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत नवे महिला धोरण मंजूर होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यात साखर कारखान्यात महिलांना 30 टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मागील मंत्रिमंडळ बैठकीत आलेलं राज्याचे महिला धोरण हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत हेातं. त्या महिला धोरणांमध्ये आणखी काही तरतुदी होणं अपेक्षित होतं. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या मागील बैठकीत राज्य सरकारच्या महिला धोरणाला मंजुरी मिळू शकली नव्हती. पण, आज सायंकाळी सहाच्या सुमारास होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मान्यता मिळणार असल्याची माहिती आहे.
राज्याचे महिला धोरण मागील कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरीसाठी आले होते. मात्र, काही वरिष्ठ मंत्र्यांनी त्या महिला धोरणांमध्ये तरतुदी सूचविल्या होत्या. त्या तरतुदींचा समावेश महिला धोरणामध्ये करावा आणि ते बिल मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पुन्हा आणावे, असेही संबंधित मंत्र्यांचे म्हणणे होते.
राज्यातील साखर कारखानदारीत महिलांना 30 टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात, अशी तरतूद करून राज्याचे नवे महिला धोरण मंत्रिमंडळ बैठकीपुढे मांडले जाणार आहे. जे साखर कारखाने महिलांसाठी 30 टक्के जागा राखीव ठेवतील, त्या साखर कारखान्यांना राज्य सरकारकडून विविध सवलती दिल्या जाणार आहेत.
या सवलतींमध्ये वीजबिलात सूट, कर्जाच्या व्याजात सवलत, यांबरोबच इतरही अनेक सवलती दिल्या जणार आहेत. या सवलतींच्या माध्यातून साखर कारखान्यांना मदत केली जाणार आहे. मात्र, महिलांना साखर कारखान्यांत 30 टक्के जागा द्याव्या लागणार आहेत. त्यामुळे महिलांना आता सहकार क्षेत्रात आपली कर्तबगार दाखविण्यासाठी वाव मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.