Satej Patil Vs Uday Samant : काँग्रेसला धक्का! 'तब्बल 9 आमदार संपर्कात, आणखी चार...'

Political News : आमदार सतेज पाटील यांच्या दाव्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी आपल्याकडं यादी असल्याचं सांगितलं...
 Satej Patil
Satej Patil sarkarnama
Published on
Updated on

Ratnagiri : काँग्रेसचा आमदार सतेज पाटील यांनी शिंदे गटातील सात खासदार यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावा केला होता. या दाव्याला शिवसेनानेते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर देत काँग्रेसला धक्का देण्याचे संकेत दिले आहेत.

 Satej Patil
Anganwadi Sevika Protest : '...तोपर्यंत भाजपला मतदान करणार नाही!'; ठाकरेंसमोरच अंगणवाडी सेविका गरजल्या

काँग्रेस सोडून कोण जाणार आहे, याची यादीच माझ्याकडे आहे. पूर्वी हा आकडा 13 होता, आता 4 लोक कमी झालेत. मात्र, नऊ लोक अजूनही शिवसेना-भाजपच्या संपर्कात आहेत, असा मोठा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. तसेच आणखी चार जण संपर्कात असून हा नऊचा आकडा पुन्हा 13 वर जाणार असल्याचेदेखील उदय सामंत यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचे काही लोकांना कळल्यामुळे ते कुठे प्रकाशात येऊ नये, म्हणून शिंदे गटातले भाजपच्या संपर्कात आहेत. असा काही लोकांचा सांगण्याचा अट्टहास असावा, असाही टोला सामंत यांनी पाटील यांना लगावला आहे. आमच्यामधील कोणी कोणाच्या संपर्कात नाही. आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांवर विश्वास ठेवतो. शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

बच्चू कडू हे महायुतीत अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. त्यावर बच्चू कडू हे आमच्या घटकपक्षातले आहेत. त्यांचा काही गैरसमज झाला असेल तो आम्ही दूर करू. त्यांना सोबत घेऊनच आम्ही पुढे जाणार, असे सामंत म्हणाले. तसेच विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मी ज्यांना माझ्या मतदारसंघात ७० हजाराचे मताधिक्य त्यांना दिलं. तरी ते टीका करत असतील तर यावर काय बोलणार. सोडून द्यायचे विषय असे म्हणत खासदार विनायक राऊत यांच्या टीकेला फार किंमत देत नसल्याचे सांगितले.

(Edited By Roshan More)

 Satej Patil
Nanded BJP News : खासदार चिखलीकर 'ॲक्शन मोड'मध्ये; म्हणाले, चव्हाण-खतगावकरांनी लावली नांदेडची वाट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com