Chandrakant Patil, DCM sunetra pawar and late Ajit Pawar, deputy CM Maharashtra sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Chandrakant Patil : "अशा परिस्थितीत भविष्यात काही मागायचे असते काही शब्द घ्यायचे असतात"; बारामतीच्या निवडणुकीवर चंद्रकांत पाटलांचं भाष्य

Chandrakant Patil : राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घ्या अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी बारामती पोटनिवडणुकीवर भाष्य केलं आहे.

Amit Ujagare

Chandrakant Patil on Baramati ByElection: माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळं रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असतानाच काँग्रेसनं आपला उमेदवार देत ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आकाश मोऱे यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. पण या राजकारणावर आता भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आज फक्त उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, अजूनही वेळ आहे. ज्यांनी निवडणुकीचे अर्ज दाखल केलेले आहेत ते माघार घेऊन निवडणूक बिनविरोध होऊ शकते. याचा अर्थ बिनविरोधसाठी अजूनही भेटीगाठी बोलणी सुरू आहे. राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घ्या, अशा परिस्थितीत भविष्यात काही मागायचं असतं, काही शब्द घ्यायचे असतात.

अजूनही खात्री आहे या दोन्ही निवडणुका (राहुरी, बारामती) बिनविरोधच आहेत. बारामती तर वनवेच आहे आणि राहुरीमध्ये कर्डिले यांनी जे काम उभं केलेलं आहे त्याच्या जोरावरच आम्ही ही निवडणूक जिंकू. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न होत आहेत, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, बारामतीत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधानामुळं पोटनिवडणूक लागली असून या ठिकाणी त्यांच्या पत्नी आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. तर राहुरीत भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन झालं. त्यामुळं या ठिकाणीही पोटनिवडणूक लागली असून भाजपनं इथं त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे.

या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात असा महायुतीचा प्रयत्न आहे. पण बारामतीत मविआतील शिवसेना-राष्ट्रवादीनं माघार घेतलीए पण काँग्रेसनं आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. तर राहुरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं या दोन्ही निवडणुका बिनविरोध होणार नाहीत त्यामुळं निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT