Ashok Kharat Case: अशोक खरात प्रकरणात अंधारेंचा आजवरचा सर्वात मोठा आरोप; वरिष्ठ पोलीस अधिकारीच...; SITच्या तपासावर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह

Ashok Kharat Case: स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी डझनभर गुन्हे दाखल झाले आहेत. हे प्रकरण अद्यापही धगधगत असून आता अंधारे यांनी SIT अर्थात विषेश तपास पथकाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Sushma Andhare On Rupali Chakankar and Ashok Kharat controversy
Rupali Chakankar seen in a viral video linked to Ashok Kharat controversy, triggering political reactions across Maharashtra.Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी डझनभर गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचबरोबर विशेष तपास पथकाद्वारे (SIT) या प्रकरणाची कसून चौकशीही केली जात आहे. हे प्रकरण उजेडात येऊन आता २० दिवस झाले तरीही त्याची चर्चा कायम आहे. यामध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत. यापार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी SITच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. खरात प्रकरणात नाशिकच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Sushma Andhare On Rupali Chakankar and Ashok Kharat controversy
Congress Rules : काँग्रेसमध्ये निष्ठावंतानाच पदं मिळणार! आता 'या' निकषांमध्ये बसत असेल तरच पद वाटपांबाबत होणार विचार

एसआयटीच्या गतीबद्दल प्रश्न

अंधारे म्हणाल्या, जी एसआयटी खरातच्या अटकेच्या दोन दिवस आधी स्थापन झाली. त्यावेळी मी या एसआयटीबद्दल सकारात्मकता दाखवली होती, पण आता नाईलाजानं मला एसआयटीच्या कार्यपद्धतीवर आणि गतीबद्दल प्रश्न उपस्थित करावे लागत आहेत. जर माझ्यापर्यंत आणि दमानियांपर्यंत तसंच इतरही अनेकांपर्यंत माहिती पोहोचत असेल तर एसआयटीपर्यंत ती माहिती का पोहोचत नाही? हे सगळं काम आम्हाला एसआयटीकडून अपेक्षित आहे. कारण पुरावे नष्ट करायला वेळ मिळू शकतो.

Sushma Andhare On Rupali Chakankar and Ashok Kharat controversy
मंदिरात दर्शन, अजितदादांचे स्मरण, मेळाव्यात भाषण! उमेदवारी दाखल करत सुनेत्रा पवारांनी रणशिंग फुंकले

एकनाथ शिंदेंची चौकशी व्हायला हवी

ज्यांच्या बद्दलची माहिती समोर येत आहे किंवा २१ मिनिटांचं संभाषण झालं आम्हाला माहिती नाही. पण १३ कॉल केले गेलेत त्यात इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल झालेत. यामध्ये अतिशय महत्वाची नावं आहेत. एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांचं नाव दुर्लक्षित करण्यासारखं नाही. या लोकांकडून जर अशोक खरातला कॉल होत असतील तर हे अत्यंत वाईट आहे. त्यामुळं या सर्वप्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे ती का होत नाही?

Sushma Andhare On Rupali Chakankar and Ashok Kharat controversy
Harshwardhan Sapkal News: बारामती पोटनिवडणुकीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या उमेदवारानं अर्ज भरला; पण सपकाळांची दांडी..? कारण आलं समोर

चाकणकरांना अद्याप चौकशी का नाही?

चाकणकरांना अजूनही चौकशीला बोलावलेलं नाही. चाकणकरांच्या सोबतचा नामकरण आवारे जो सगळी ही भोंदूगिरी स्थापित करण्यासाठीचा गुन्हेगार नंबर वन नामकरण आवारेची सख्खी मुलगी गमेच्या घरात दिलेली आहे. गमे हा शिवानिका ट्रस्टचा एक विश्वस्त आहे. या गमे आणि आवारे नंतर ललित पोफळे हे अत्यंत महत्वाचं नाव आहे. पोफळे हे सीए असून त्यानं अनेक बड्या नेत्यांच्या मदतीनं काही कंपन्या उभ्या केल्याची माहिती पुढे येत आहे. या कंपन्या आणि त्यातील बडे नेते यांची नावं आमच्याकडं आहेत. त्याचे इनपूट आम्ही वेळोवेळी एसआयटीला देण्याचा प्रयत्न करत आहोत. मी दोन वेळा पुनरुच्चार केला आहे आणि आज पुन्हा सांगते की, नाशिकच्या काही वरिष्ठ स्तरावरील पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा यातला समावेश त्या पोलीस अधिकाऱ्यांचे इनपूट आम्ही एसआयटीला दिलेले आहेत. मात्र, त्याही दृष्टीनं कुठलीही सकारात्मक पावलं पडलेली नाहीत.

Sushma Andhare On Rupali Chakankar and Ashok Kharat controversy
Shivsena Vs BJP : दानवे खोतकरांच्या ग्वाहीनंतरही भडका? शिवसेना-भाजपचे नगरसेवक भिडले; तीव्र वाद अन् तणावपूर्ण वातावरण

खरातचं कुटुंबिय बाहेर का?

अजून एक महत्वाची गोष्ट अशोक खरातची पत्नी कल्पना खऱात, मुलगी सृष्टी खरात आणि त्याचा मुलगा चौकशीनंतर गायब झाला आहे. ही लोकं एकाच वेळी एसआयटीकडून ताब्यात का घेतली जात नाहीत? कारण त्यांच्याकडून पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. एसआयटी या गोष्टींकडं का दुर्लक्ष करत आहे, असा आरोपही सुषमा अंधारे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com