DiliP Sopal  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maharashtra Politic's : ठाकरेंच्या बड्या शिलेदाराची वर्धापनदिन अन्‌ डिनर डिप्लोमसीला दांडी; सोलापूर जिल्ह्यात चर्चा!

DiliP Sopal Absent Shivsena Anniversary : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर एखाद्या आमदाराची वर्धापनदिनासारख्या कार्यक्रमाला हजेरी नसणे बरेच काही सांगून जाणारे आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 21 June : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापनदिन कार्यक्रम मुंबईत नुकताच पार पडला. तसेच, आमदार, खासदारांसाठी डिनर डिप्लोमसीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या दोन्ही कार्यक्रमाला पक्षाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल हे गैरहजर होते, अशी माहिती आहे. सोपल नेमके कोणत्या कारणामुळे शिवसेनेच्या वर्धापनदिनाला गैरहजर राहिले, हे मात्र समजू शकलेले नाही.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही आमदार आणि खासदार हे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा होती. तसेच, ऑपरेशन टायगरची चर्चा काही महिन्यांपूर्वी होती. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) यांची मुख्य कार्यक्रमाला गैहजर राहणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चिंता वाढविणारे ठरण्याची शक्यता आहे.

माजी मंत्री दिलीप सोपल हे बार्शी मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत. यापूर्वीही दिलीप सोपल यांनी शिवसेनेसोबत घरोबा केला होता. मात्र त्यांची मैत्री शिवसेनेसोबत जास्त काळ टिकू शकलेले नव्हती. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या शिलेदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर एखाद्या आमदाराची वर्धापनदिनासारख्या कार्यक्रमाला हजेरी नसणे बरेच काही सांगून जाणारे आहे. वर्धापनदिनाबरोबरच पक्षाने आयोजित करण्यात आलेल्या डिनर डिप्लोमसीलाही दिलीप सोपल यांनी दांडी मारली आहे, त्यामुळे त्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, आमदार दिलीप सोपल हे सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर आहेत, अशी माहिती आहे, त्यामुळे कदाचित आमदार सोपल हे कार्यक्रमाला हजर राहू शकलेले नसावेत, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी दिलीप सोपल यांनी ठाकरेंच्या अनेक कार्यक्रमाला दांडी मारलेली आहे, त्यामुळे दिलीप सोपल हे शिवसेनेत नाराज आहेत की काय, अशी चर्चा आता रंगली आहे.

मुळात दिलीप सोपल हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेले नेते आहेत, त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर सोपल हे शरद पवारांसोबत गेले होते. सोपल हे नेहमी माझा ‘श’ पक्ष असल्याचे अनेकदा जाहीरपणे सांगितले होते. वर्षभरापूर्वी शरद पवार हे बार्शीच्या दौऱ्यावर आले होते, त्या वेळी त्यांनी सोपलांच्या घरी जाऊन दिलीप सोपल यांची भेट घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT