Chandrashekhar Bawankule, Ranjitsinh Naik Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Phaltan BJP News : बावनकुळेंनी केले खासदार निंबाळकरांचे कौतुक; भाजप लाेकसभेच्या 45 जागा जिंकेल....

Chandrashekhar Bawankule माढा लोकसभेअंतर्गत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज फलटण येथे आले होते.

Umesh Bambare-Patil

Phaltan BJP News : माढा लोकसभा मतदारसंघांत भाजपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. देशातील पहिल्या दहा खासदारांत विकासकामांबाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वरचा नंबर लागत लागतो. याचा आम्हाला अभिमान असून भाजप राज्यात मित्रपक्षांच्या बरोबरीने 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

माढा लोकसभेअंतर्गत कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात तसेच जनसामानांच्या भेटीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekar Bawankule हे आज (26 डिसेंबर) फलटणमध्ये आले होते. यावेळी त्यांनी माढाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर Ranjitsinh Naik Nimbalkar यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम , माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर, माजी आमदार प्रशांत परिचारक, सोलापूरचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून गोरगरिबांपर्यंत अनेक योजना पोहचवल्या आहेत.

मोदी सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आणि जनतेशी, कार्यकर्त्यांशी हितगुज करण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजप व मित्रपक्ष 45 पेक्षा अधिक जागा जिंकतील, हा माझा शंभर टक्के दावा असून जागा वाटपाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते निर्णय घेतील, असे बावनकुळे म्हणाले.

माढा लोकसभा मतदारसंघात पाच वर्षांच्या काळात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी देशात सर्वाधिक निधी खेचून आणला असून देशातील लोकप्रिय दहा खासदारांमध्ये त्यांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. माढा लोकसभा मतदारसंघात अनेकजण इच्छुक आहेत. याबाबत बोलताना, इच्छुक असणे हा प्रत्येकाचा हक्क असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून निवडून कोण येईल याचा अंदाज घेऊनच कोणाला तिकीट द्यायचे याबाबतचा निर्णय भाजपचे पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. देशातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात भाजपला अनुकूल परिस्थिती आहे. त्यामुळे पुन्हा भाजपचेच सरकार येणार असून महाराष्ट्रातसुद्धा 45 पेक्षा जास्त जागा लोकसभेला मिळणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

Edited By : Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT