Madha Loksabha : भाजपचे मिशन 'माढा' ; प्रदेशाध्यक्ष बावनकुळे दौऱ्यावर..

Chandrasekhar Bawankule's statewide 'Mahavijay 2024' : सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार..
Chandrasekhar Bawankule
Chandrasekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Madha Loksabha : सातारा लोकसभा मतदारसंघानंतर भाजपने आपला मोर्चा माढा लोकसभा मतदारसंघात वळविला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राज्यव्यापी ‘महाविजय 2024’ लोकसभा दौऱ्याअंतर्गत मंगळवार, दि. 26 डिसेंबर 2023 रोजी माढा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यात ते लोकसभा क्षेत्रातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरिअर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील.

माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघातील सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात माण व फलटण या विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांची सकाळी 10.30 वाजता मते जाणून घेतील. दुपारी 12.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक बाजारपेठ येथे 'संपर्क से समर्थन' अभियानात सहभागी होतील. यानंतर ते जनतेशी संवाद साधणार आहेत.

Chandrasekhar Bawankule
Nagpur : लाेकसभेच्या जागावाटपावर रडत बसाल, तर 2024 नंतर तिहार जेलमध्ये दिसाल

अकलूज (जि. सोलापूर) येथील कृष्णप्रिया हॉल येथे सायंकाळी 4.30 वाजता करमाळा, माढा, सांगोला व माळशिरस या विधानसभा क्षेत्रातील सुपर वॉरियर्स व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. यासोबतच ते काही प्रतिष्ठित नागरिकांच्या स्नेहभेटी घेणार आहेत व भाजपा संघटनात्मक बैठकीत सहभागी होतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) दौऱ्याचे नियोजन व तयारी खासदार रणजित नाईक - निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार राम सातपुते, प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, पश्चिम महाराष्ट्र भाजप (BJP) विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे करत आहेत.

लोकसभा समन्वयक राजकुमार पाटील, लोकसभा निवडणूक प्रमुख प्रशांत परिचारक, सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, सोलापूर दक्षिण जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, धैर्यशील मोहिते पाटी, बजरंग गावडे, अमोल सास्ते, जयकुमार शिंदे, सचिन अहिवळे यांच्यासह सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व प्रमुख पदाधिकारी व जिल्हा कार्यकारिणीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते यांच्यावर दौऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

(Edited by Amol Sutar)

Chandrasekhar Bawankule
Devendra Fadnavis : 'सी-व्होटर'च्या सर्व्हेवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,"देशात फक्त मोदींचीच...''

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com