BDO Notice
BDO Notice Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मोठी बातमी : २४ तासांत खुलासा करा; अन्यथा कारवाई करू : कर्नाटकात जाण्याचा ठराव केलेल्या ११ गावांना बीडीओंची नोटीस

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : महाराष्ट्र (Maharashtra)-कर्नाटक (Karnataka) सीमा वादात सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील ११ गावांनी कर्नाटकात समाविष्ठ होण्याचा ठराव केला होता. ही गावे आता चांगलीच अडचणीत सापडली आहेत. त्यांना अक्कलकोटचे गटविकास अधिकारी (BDO) यांनी नोटीस (Notice) पाठवली असून ठरावाबाबत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नोटीस कारवाईमुळे सोलापुरात मोठी खळबळ उडाली आहे. (BDO notice to 11 villages of Akkalkot taluka that decided to move to Karnataka)

या नोटिशीमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा पुरवत आहे. तरीही यांसदर्भात ग्रामस्थांचा गैरसमज दूर करून सदर ठरावाबाबत त्यांना परावृत्त करणे आवश्यक असूनही ग्रामसभेच्या विषय पत्रिकेत हा विषय घेऊन ठराव पारित करण्यासाठी मदत केल्याबद्दल तुम्हाला जबाबदार धरून तुमच्यावर कारवाई का करू नये, अशी विचारणा करण्यात आली आहे. ही नोटीस मिळाल्यापासून २४ तासांच्या आतमध्ये याबाबतचा खुलास देण्यात यावा. याबाबतचा समाधानकारक खुलासा न केल्यास तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारही अक्कलकोटच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिला आहे.

मूलभूत सुविधा द्या; अन्यथा आम्हाला कर्नाटक राज्यात समाविष्ट होऊ द्या. महाराष्ट्रात गेल्या ७० वर्षांपासून आम्हाला मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. शेजारी असलेल्या कर्नाटकातील गावे, सीमेपर्यंत विकसित झाली आहेत. पण, महाराष्ट्रातील सीमेवर असणाऱ्या गावांत विकास अद्याप पोहोचायचा आहे. अशा समस्यांचा पाढा वाचत अक्कलकोट तालुक्यातील अकरा गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव केला होता.

अक्कलकोट तालुक्यातील याच ११ गावांना आता प्रशानाच्या वतीने गटविकास अधिकारी यांनी नोटीस पाठवली आहे. त्यात कर्नाटकात जाण्याबाबतच्या ठरावावर खुलासा करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. दरम्यान, नोटिस मिळताच आळगी गावच्या ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. आम्हाला नोटीस कसली देताय, नोटीस नको मूलभूत सुविधा द्या, अशा शब्दांत गावकऱ्यांनी प्रशासनाला सुनावले आहे. अक्कलकोट तालुक्यातील ११ गावांनी ठराव केल्यापासून एकही अधिकारी आमच्या गावात फिरकला नाही, असेही गावकऱ्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT