Satara BDO Satish Budhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara News : बीडीओ सतीश बुद्धे यांच्या 'त्या' फलकाची चर्चा; काय आहे जाणून घ्या...

Satara BDO कामानिमित्त गटविकास अधिकाऱ्यांना सातारा तालुक्यातील भागांमध्ये दौरे करावे लागतात. लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात. अशा वेळेला ते कार्यालयात उपस्थित राहू शकत नाहीत.

Umesh Bambare-Patil

Satara News : सातारा जिल्ह्यात काम करताना अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. मात्र, सातारा पंचायत समितीचे नवीन गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी आपल्या दालनाबाहेर 'मी माझ्या पगारात समाधानी आहे' असा फलक लिहिला आहे. त्यांच्या या फलकाची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे.

प्रशासकीय कामकाज करत असताना ग्रामीण भागातील लोकांचा कळत नकळत सातारा पंचायत समितीशी Satara Panchayat Samiti संपर्क व संबंध येतो. अशा वेळेला घरकुलापासून ते रस्ता, पाणीपुरवठा योजना दुरुस्ती, शाळेच्या खोल्या व इतर विकासकामांबाबत वरिष्ठ अधिकारी म्हणून गटविकास अधिकाऱ्यांशी BDO Satara संपर्क येतो.

कधी कधी शासकीय कामानिमित्त गटविकास अधिकाऱ्यांना सातारा तालुक्यातील अनेक भागांमध्ये दौरे करावे लागतात. लोकांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात. अशा वेळेला ते कार्यालयात उपस्थित राहू शकत नाहीत.

त्यामुळे लोकांची कामे खाोळंबू नयेत म्हणून सातारा पंचायत समितीचे नवे बीडीओ सतीश बुद्धे यांनी आपल्या दालनाबाहेर 'मी माझ्या पगारात समाधानी आहे' असा फलक लावला आहे. त्यांच्या या फलकाची सध्या जिल्ह्यात चर्चा आहे.

या फलकावर त्यांनी आपला व्हाॅटस्‌अॅप क्रमांक लिहिला असून, ते ज्यावेळी त्यांच्या दालनात उपलब्ध नसतील. त्यावेळी कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी आपली निवेदने व तक्रारी या नंबरवर पाठवावीत, असे लिहिले आहे. Maharashtra Political News

त्यासाठी त्यांनी आपला संपर्क नंबर कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावला आहे. यातून लोकांची कामे गतीने व्हावीत, हा त्यांचा उद्देश आहे. यातून लोकांमध्ये एक चांगला संदेश गेला आहे. पंचायत समितीत पारदर्शक कारभार व्हावा. याच भावनेतून त्यांनी ही अभिनव संकल्पना राबवली आहे. सध्या या फलकाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Edited By Umesh Bambare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT