-हेमंत पवार
Satara Prithviraj Chavan News : पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेला निर्णय जनतेच्या रेट्यामुळे रद्द करावा लागला. आता तसाच रेटा आल्यामुळे हा कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करावा लागला आहे. कंत्राटी भरतीतील अग्निवीर ही मातृ योजना असून, याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सरकार समर्थन करते. मुळात अग्निवीर योजनाही रद्द करावी, अन्यथा जनतेचा रेटा तुम्हाला माहितीच आहे, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.
कंत्राटी भरतीचा निर्णय महविकास आघाडी सरकारच्या काळातील होता, असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस Devendra Fadanvis यांनी महाविकास आघाडीला टार्गेट केले आहे. त्यावर भाजपकडून आज अनेक ठिकाणी महाविकास आघाडीविरोधात आंदोलनही करण्यात आले. त्यानंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चव्हाण म्हणाले, राज्यातील शिंदे, फडणवीस आणि पवार सरकारने काढलेला २३ सप्टेंबरचा महत्त्वांच्या कार्यकारी पदांच्या कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यांनी चूक सुधारली ही चांगली गोष्ट आहे. मात्र, कंत्राटी भरतीमधील अग्निवीर योजना ही मातृयोजना आहे.
त्यालाच राज्यातील सत्ताधारी सरकारने समर्थन दिले आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेला निर्णय जनतेच्या रेट्यामुळे रद्द करावा लागला. आता तसाच रेटा आल्यामुळे हा कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करावा लागला आहे. त्यामुळे अग्निवीर योजनाही रद्द करावी, अन्यथा जनतेचा रेटा तुम्हाला माहितीच आहे, असा इशाराही त्यांनी दिला. maharashtra Political News
कंत्राटी भरतीतील अग्निवीर योजना ही मातृ योजना आहे. त्यालाच या सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सरकार समर्थन करत आहे, असा पलटवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.