Bhagirath Bhalke Abhijeet Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhagirath Bhalke News : "कारखाना की कर्मकांड वाचवायला तिकडे गेलेत", भालकेंचा अभिजित पाटलांवर वार

Akshay Sabale

Pandharpur News : शिखर बँकेनं तब्बल चारशे कोटींच्या थकबाकीचं कारण समोर करत विठ्ठल सहकारी साखर कारखाना ( Vitthal Sahkari Sakhar Karkhana ) सील केला आहे. पण, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला वाचवण्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी जो कुणी आम्हाला मदत करेल, त्याला आम्ही मदत करू, अशी प्रतिक्रिया चेअरमन अभिजित पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्याभेटीनंतर व्यक्त केली होती. यावरून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, 'बीआरएस'चे नेते, भगिरथ भालके यांनी अभिजित पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

"साखर कारखाना कर्मकांड वाचवायला तिकडे गेलेत," असं म्हणत भालके ( Bhagirath Bhalke ) यांनी अभिजित पाटील ( Abhijeet Patil ) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच, "संस्था वाचवण्यासाठी आम्ही कधीही पुढं येऊन लढण्यास तयार आहे," असा निर्धारही भगिरथ भालके यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांच्या प्रचारार्थ पंढरपुरातील गादेगाव येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला माजी मंत्री विश्वजित कदम हेही उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"महाविकास आघाडी, शरद पवार यांच्या पाठिमागे उभे राहतो म्हणून छाती बडवून-बडवून काही जणांनी भाषण केली आणि आता निघून गेले. जाणाऱ्याबद्दल बोलण्याची इच्छा नाही," असा टोला भालके यांनी पाटील यांना लगावला.

यावेळी मेळाव्यातील एक कार्यकर्ता उठला आणि म्हणाला, 'अभिजित पाटील यांची अडचण असल्यानं ते तिकडे गेले आहेत. कुणाचाही त्यांच्यावर दबाव नाही.'

त्यावर भगिरथ भालके म्हणाले, "मी माझं मत मांडत आहे. बँकेच्या चुकीच्या कारवाईला विठ्ठल सहकारी साखर कारखाना समोरे जात असताना दुसऱ्या दिवशी त्यांची ( अभिजित पाटील ) बंद खोलीत बैठक झाली. तेव्हा 'भगिरथ भालकेनं कारखान्यावर कारवाई करायला लावली. षडयंत्र रचलंय. त्यामुळे भालके भाजपत जाण्याआधी आपण प्रवेश करावा,' असं ते ( अभिजित पाटील ) बैठकीत बोलले."

"महाविकास आघाडीचं सरकार असताना कारखान्यावर कधीही चुकीची कारवाई झाली नव्हती. कारवाई आणि तुरुंगाला घाबरून कोण पाय लावून पळून गेले माहिती नाही. पण, मी चेअरमन असताना एका पोत्याला आठशे रूपये घेतल्याशिवाय बँक साखर विकू देत नव्हती. दोन हंगाम झालेत. बँकेकडे पैसे भरले असते, तर कारवाई झाली नसती," असं भालके यांनी म्हटलं.

"कारवाई कुणी, कुणासाठी केली, याचं आम्हाला काही देणं-घेणं नाही. संस्था वाचविण्यासाठी आम्ही कधीही पुढं येऊन लढण्यास तयार आहे. मात्र, बगलबच्च्यांच्या समाधानासाठी माझ्यावर चुकीचे आरोप कराल, तर सहन करणार नाही. येथून पुढं वेगळ्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला, तर माझ्याकडं कुंडली तयारी आहे. साखर कारखाना की कर्मकांड वाचवायला तिकडे गेलेत, हे पाहावं लागणार आहे," असं टीकास्र भालके यांनी अभिजित पाटील यांच्यावर डागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT