Devendra Fadnavis News : फडणवीसांनी पहिल्यांदाच रणजितसिंह मोहिते-पाटलांचा उल्लेख करत केला हल्लाबोल; म्हणाले...

Devendra Fadnavis In Malshiras : "माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेच निवडून येणार आहेत," असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
ranjitsinh mohite patil Devendra Fadnavis
ranjitsinh mohite patil Devendra Fadnavissarkarnama

माढा लोकसभा मतदारसंघातील ( Madha Lok Sabha Election 2024 ) राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. मोहिते-पाटील आणि विद्यमान खासदार निंबाळकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. माढा मतदारसंघात रविवारी ( 28 एप्रिल ) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यावर बोलणं टाळलं होतं. आता पहिल्यांदाच फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा उल्लेख करत हल्लाबोल केला आहे.

माढा मतदारसंघातीत उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर ( Ranjitsingh Naik Nimbalkar ) यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांची सभा पार पडली. या सभेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) घराणेशाहीवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ), माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे ( Sushilkumar Shinde ) आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील ( Vijaysinh Mohite Patil ) यांच्यावर निशाणा साधला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"सोलापूरला शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयदादा एकत्र आले होते. तेव्हा त्यांनी 30 वर्षांनी पुढील पिढीच्या भविष्यासाठी एकत्र आल्याचं सांगितलं. पण, ही पुढची पिढी म्हणजे जनता नाही. तुमच्या भविष्यासाठी हे एकत्र आले नाहीत, तर शरद पवार सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे प्रणिती यांच्यासाठी आणि विजयदादा धैर्यशील, रणजितदादांसाठी ( Ranjitsinh Mohite Patil ) एकत्रित आले आहेत," असं म्हणत फडणवीसांनी लक्ष्य केलं आहे.

ranjitsinh mohite patil Devendra Fadnavis
Abhijeet Patil Meet Fadnavis : लोकसभेला भाजपला मदत करा; आम्ही विठ्ठल कारखान्याला मदत करू; फडणवीसांचा अभिजित पाटलांना शब्द

"माढा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेच निवडून येणार आहेत. निंबाळकरांनी मोदी यांच्या आशीर्वादानं दिलेले शब्द पूर्ण केले आहेत. 50 वर्षे ज्यांना नेतृत्व दिलं, ते प्रत्येक निवडणुकीत तीच-तीच भाषणं, घोषणा करत होते. पण, ते कधीही पूर्ण झालं नाही," अशी टीकाही अप्रत्यक्षपणे फडणवीसांनी मोहिते-पाटील यांच्यावर केली आहे.

R

ranjitsinh mohite patil Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News : अकलूजमध्ये रणजितसिंह मोहिते-पाटलांचा पुष्पगुच्छ फडणवीसांनी स्वीकारला नाही

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com