Praniti Shinde-Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhagirath Bhalke : प्रणिती शिंदेंच्या प्रचारातून भगीरथ भालके गायब!

Solapur Lok Sabaha Election : भगीरथ भालके यांनी सोलापूर येथे प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आणि दुसऱ्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली. त्यानंतर कासेगाव येथे प्रचार सभा घेत रणशिंग फुंकले; परंतु त्यानंतर भालके प्रचारात सक्रिय सहभागी दिसले नाहीत

हुकूम मुलाणी

Mangalvedha, 27 April : लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारातून पंढरपूरचे नेते भगीरथ भालके हे दोन दिवसांपासून गायब झाले आहेत. प्रणिती शिंदे यांच्या निवडणुकीचा अर्ज भरायला हजेरी लावणारे भालके निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना त्यातून गायब झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी (Loksabha Election) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटाने सत्ताधारी भाजपशी जुळवून घेत मंत्रिपदे मिळवली. सध्याही अनेक नेते भाजपच्या गळाला लागल्याचे सांगितले जाते. सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे यांनी नागपूरमध्ये जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण दररोज वेगवेगळे रुप घेताना दिसत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसडून आमदार प्रणिती शिंदे निवडणूक लढवत आहेत, तर भाजपकडून राम सातपुते हे रिंगणात उतरले आहेत. भगीरथ भालके यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटीलही प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार वेग धरत आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यात असतानाच राज्य सहकारी बॅंकेने विठ्ठल कारखान्यावरील 430 कोटी थकीत कर्जाप्रकरणी कारखाना जप्तीची कारवाई बॅंकेकडून करण्यात आली आहे. त्यानंतर विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू झाली.

दरम्यान विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके यांनी यापूर्वी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे शिबिर घेतले होते. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती, त्यांनी भाजपचे काम करावे यासाठी वरिष्ठ पातळीवर राजकीय नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त आहे. त्यांच्या समर्थकांनी यापूर्वीच काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांचे काम सुरू केले. भगीरथ भालके यांनी सोलापूर येथे प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीचे समर्थन केले आणि दुसऱ्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजेरी लावली. त्यानंतर कासेगाव येथे प्रचार सभा घेत रणशिंग फुंकले; परंतु त्यानंतर भालके प्रचारात सक्रिय सहभागी दिसले नाहीत

आज काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांनी बोराळे, मरवडे, हुलजंती, सलगर बुद्रुक या ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. या सभेत भगीरथ भालके यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे भगीरथ भालके नेमके कोठे गायब झाले, अशी चर्चा रंगली आहे. यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही. त्यामुळे भालके हे कोणत्याही गोष्टीसाठी नाराज आहेत, याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT