Madha Lok sabha : फडणवीस माढ्यात ॲक्टिव्ह; काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटलांना अकलूजमध्ये भेटणार

Devendra Fadnavis Meet Dhavalshinh Mohite Patil : गेली काही महिने राजकीय घडामोडींपासून अलिप्त असणारे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हे उद्या (ता. 28 एप्रिल) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. अकलूज येथील धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी 4 वाजता ही भेट होणार आहे.
Devendra  Fadnavis- Dhavalshinh Mohite Patil
Devendra Fadnavis- Dhavalshinh Mohite Patil Sarkarnama

Solapur, 27 April : विदर्भातील निवडणुकीतून रिकामे झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माढा लोकसभा मतदारसंघात ॲक्टिव्ह झाले आहेत. दोन दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय माळशिरस विकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांना माळशिरस तालुक्यात सक्रिय केले आहे. आता खुद्द मोहिते पाटील घराण्यातील युवा नेत्याला गळाला लावले आहे. धैर्यशील मोहिते पाटील आणि इतरांनी भाजपची साथ सोडलेली असतानाच फडणवीस हे उद्या (ता. 28एप्रिल) काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना भेटणार आहेत. ही भेट अकलूजमध्ये धवलसिंह यांच्या घरी होणार असल्याची माहिती आहे.

गेली काही महिने राजकीय घडामोडींपासून अलिप्त असणारे काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील (DhavalSinh Mohite Patil) हे उद्या (ता. 28 एप्रिल) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहेत. अकलूज (Akluj) येथील धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी 4 वाजता ही भेट होणार आहे. धवलसिंह हे माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र, तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra  Fadnavis- Dhavalshinh Mohite Patil
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

दरम्यान, राज्य सहकारी बॅंकेने जप्तीची कारवाई केलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हेही महाविकास आघाडीची साथ सोडण्याची शक्यता आहे. त्यानंतर खुद्द काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील हेही फडणवीस यांची भेट घेणार आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीला सोलापूर जिल्ह्यात दिवसांतील दुसरा धक्का मानला जात आहे.

चोर समजून केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी धवलसिंह मोहिते पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्यांना उच्च न्यायालयातही जामीन मिळालेला नाही, त्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील हे गेली काही महिन्यांपासून सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत. लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित नव्हते. तसेच, राहुल गांधी यांची नागपूरमध्ये सभा झाली, त्या सभेलाही धवलसिंह गेले नव्हते, ते गेली काही महिन्यांपासून राजकारणापासून अलिप्तच आहेत. उद्या ते भाजपमध्ये प्रवेश करणार की फडणवीसांची सदिच्छा भेट घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Devendra  Fadnavis- Dhavalshinh Mohite Patil
Onion Export Ban : पवारांनी प्रचाराचा मुद्दा बनवताच केंद्राने लाल कांद्याची निर्यातबंदी शिथिल केली; सहा देशांत निर्यातीस परवानगी

फडणवीसांच्या उद्या माढ्यात तीन सभा

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माढा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी उद्या (ता. 28 एप्रिल) तीन सभा घेणार आहेत. माढा तालुक्यातील वाकाव येथे रविवारी दुपारी सव्वा बारा वाजता फडणवीसांची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर सांगोल्यात अडीच वाजता, तर मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या अकलूजमध्ये दुपारी साडेचार वाजता फडणवीस सभा घेणार आहेत.

R

Devendra  Fadnavis- Dhavalshinh Mohite Patil
Abhijeet Patil Group Meeting : ‘विठ्ठल’वरील कारवाईनंतर अभिजित पाटलांनी बोलावली समर्थकांची बैठक; निर्णयाकडे लक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com