Bhagirath Bhalke
Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भगिरथ भालकेंनी राष्ट्रवादीतील मतभेदाबाबत जयंत पाटलांना दिली ग्वाही

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीतील पराभवानंतर या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला होता. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला जप्तीची नोटीस आल्यानंतर तो जाहीरपणे पुढे आले होते. त्यावेळी एकमेकांची उणीदुणी काढली गेली होती. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या आजच्या दौऱ्यात भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांनी आगामी निवडणुकीत आमच्यातील सर्व मतभेद बाजूला ठेवून हातात हात घालून काम करण्याची ग्वाही पक्षश्रेष्ठींना दिली (Bhagirath Bhalke gave words to Jayant Patil end the disput in Pandharpur NCP)

राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आजपासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पंढरपुरातील आढावा बैठकीत भालके यांनी जयंत पाटील यांना मतभेद मिटवण्याची ग्वाही दिली.

भगिरथ भालके म्हणाले की, भारतनाना भालके यांना मतदानरूपी आशीर्वाद देऊन पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जनतेने निवडून दिले. सन २००९ मध्ये अपक्ष म्हणून; तर २०१४ मध्ये काँग्रेसमध्ये असताना ज्येष्ठ नेते शरद पवारांना दैवत मानून भारतनानांनी शेवटपर्यंत काम केले आहे. भालकेनानांच्या नंतर पोटनिवडणुकीच्या माध्यमातून पवारसाहेब, अजितदादा, जयंत पाटील यांनी उमेदवार या नात्याने माझ्यावर जबाबदारी सोपवली. मात्र, त्या पोटनिवडणुकीत दुर्दैवाने माझा पराभव झाला.

पंढरपूर पोटनिवणुकीतील उमेदवार या नात्याने झालेला पराभव स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात पोचविण्याची जबाबदारी आता आमची असणार आहे. आगामी निवडणुकीत ती अधिक ताकदीने निभावली जाईल. आमच्यातील काही मनभेद असतील, तर ते बाजूला सारून पवारांचा विचार वाढविण्यासाठी आम्ही हातात हात घालून काम करण्याची भूमिका आम्ही सर्वांनी घेतली आहे, अशी ग्वाही भगिरथ भालके यांनी या वेळी दिली.

विठ्ठल कारखान्यावर जप्तीची नोटीस आल्यानंतर युवराज पाटील आणि भालके समर्थकांमध्ये जाहीररित्या कलगीतुरा रंगला होता. पुढच्या बैठकीपर्यंत कारखाना सुरू केला नाही तर मी अध्यक्षपदाचा राजीनामा देईन, असे सांगितले होते. मात्र, मदत न मिळाल्याने भालके यांनी राजीनामा द्यावा, अशी जाहीर मागणी युवराज पाटील यांनी केली होती. दोन्ही गटाच्या समर्थकांकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले होते. त्यामुळे भालके यांची आजची भूमिका महत्वाची ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT