Bhaiyya Mane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

MLC Election : मंत्री हसन मुश्रीफांचा सेनापती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर? पुणे पदवीधरमधून उमेदवारीची चर्चा

Bhaiyya Mane NCP Sharad Pawar : भैय्या माने यांनी बंडाचा झेंडा फडकवत स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून शरद लाड यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.

Roshan More

Pune Graduate Constituency : पुणे पदवीधर मतदारसंघात उमेदवारीवरून जोरदार घडामोडी घडत आहेत. महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रताप उर्फ भैय्या माने यांनी बंडखोरी केली आहे. दरम्यान, ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात आहे, अशी माहिती 'सरकारनामा'ला विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.भैय्या माने हे आज शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

ते आज रात्री पुणे किंवा मुंबईत पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या विषयी त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी याचा इन्कार केला. असे काही होणार नसल्याची माहिती त्यांनी दिली.

भाजपकडून शरद लाड यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत असलेले भैय्या माने यांनी बंडाचा झेंडा फडकवत स्वबळावर मैदानात उरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा प्रचार देखील सुरू आहे.

महाविकास आघाडीत पदवीधरची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. येथून त्यांच्याकडून वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू होती. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख-जाधव यांचे नाव शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी आघाडीवर होते.

छत्रपती संभाजीनगर राष्ट्रवादीकडे?

महायुतीचा जागावाटपाचा फाॅर्म्युला निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. त्यामध्ये पुणे पदवीधर, शिक्षकची जागा भाजपकडे असणार आहे. तर, अमरावती शिक्षकची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT