MLC Election: शिक्षक/पदवीधर मतदारसंघांसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर; कुठल्या विभागातून कोणाला मिळाली संधी?

MLC Election: राज्यातील शिक्षक/पदवीधर मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची लगबग सध्या सुरु आहे. या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढत असून दुसरीकडं मात्र महायुती एकत्रित निवडणुका लढवणार आहे.
Jayant Asgaonkar, Abhijeet Wanjari, Prof. Aditi Pohare
Jayant Asgaonkar, Abhijeet Wanjari, Prof. Aditi Pohare
Published on: 
Updated on: 

MLC Election: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ३ पदवीधर आणि २ शिक्षक अशा एकूण ५ मतदारसंघांसाठी द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. काँग्रेसनं या निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. काँग्रेसनं कुठल्या मतदारसंघातून कोणाला संधी दिली? जाणून घेऊयात.

काँग्रेसच्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत असगावकर यांना संधी देण्यात आली आहे. तर नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजित वंजारी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सध्या वंजारी हे याच मतदारसंघातून आमदार आहेत. तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून प्रा. अदिती पोहरे यांना उमेदवारी काँग्रेसनं जाहीर केली आहे.

Jayant Asgaonkar, Abhijeet Wanjari, Prof. Aditi Pohare
Abhijeet Dipke: "देवेंद्र फडणवीस ऐकताय का? मी पुन्हा येईन...."; अभिजीत दिपकेंचं शिवाजी पार्कमधून थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

दरम्यान, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), पुणे, नागपूर विभाग या पदवीधर मतदारसंघांसह अमरावती आणि पुणे विभाग या दोन शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक जाहीर झाली आहे. या जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी संपणार आहे. कार्यकाळ संपत असलेल्या आमदारांमध्ये सतीश चव्हाण (औरंगाबाद पदवीधर), अरुण लाड (पुणे पदवीधर), अभिजीत वंजारी (नागपूर पदवीधर), किरण सरनाईक (अमरावती शिक्षक) आणि जयंत आसगावकर (पुणे शिक्षक) यांचा समावेश आहे.

Jayant Asgaonkar, Abhijeet Wanjari, Prof. Aditi Pohare
कॅप्टन स्मित मच्छार कोण आहेत? त्यांच्या आडनावाची आहे विशेष कहाणी

निवडणूक कार्यक्रम असा...

  • अधिसूचना : २९ सप्टेंबर २०२६

  • उमेदवारी अर्ज अंतिम तारीख : ६ ऑक्टोबर २०२६

  • अर्जांची छाननी : ७ ऑक्टोबर २०२६

  • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : ९ ऑक्टोबर २०२६

  • मतदान : २३ ऑक्टोबर २०२६ (सकाळी ८ ते दुपारी ४)

  • मतमोजणी व निकाल : २७ ऑक्टोबर २०२६

  • प्रक्रिया पूर्ण : ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com